-rat२५p४.jpg-
२५N४७५४०
प्रयागराज ः राष्ट्रीय प्रमुख दिनेश उपाध्याय यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना अनिकेत बापट.
----
अनिकेत बापट यांचा
प्रयागराजमध्ये सन्मान
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ : प्रयागराज येथे झालेल्या भारतीय गोरक्षा परिषदेत चिपळूणचे अनिकेत बापट यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रमुख दिनेश उपाध्याय, सर्व केंद्रीय पदाधिकारी व संत उपस्थित होते. गोरक्षण व संवर्धनासाठी विविध राज्यांमध्ये गोसेवा आयोगाच्या माध्यमातून चांगले काम करणाऱ्या चार राज्यांच्या अध्यक्षांना आमंत्रित करण्यात आले होते. यात महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, विश्व हिंदू परिषदेचे गोरक्षा भाऊराव कुदले यांच्यासह देशातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अनिकेत बापट यांचा राष्ट्रीय प्रमुख उपाध्याय यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. बापट हे गेली २०१६ पासून शुद्ध कोकण कपिला वंशवृद्धी प्रकल्प (यात उत्पन्नाचे साधन म्हणून दूध न घेता गोमय-गोमुत्रावर भर देण्यात येतो) तसेच अधिकृत परवानाधारक आणि शास्त्रशुद्ध दर्जेदार पंचगव्य आयुर्वेदिक उत्पादने, पंचगव्य निसर्गोपचारतज्ञ अशा क्षेत्रात कार्य करत आहेत.