आजच्या युगात धावपळ आणि दगदग हा आयुष्याचा नित्यक्रम आणि नित्यकर्म झालं आहे. ऑफिस आणि घर सांभाळताना पुरूषच नाही तर स्त्रीयांची कमालीची दमछाक होते. अनेकजण जीम अथवा योगा क्लास लावतात. पण दुखणं इतकं वाढतं, थकवा इतका असतो की आंथरूणाहून लवकर उठू वाटतं नाही. शारीरिक-मानसिक थकवा, हातपाय दुखी, कंबर, गुडघे दुखी, केस गळती, शारीरिक दुर्बलतेने अनेक जण त्रस्त असतात. मग बाजारातील अनेक औषधांचा शरीर हे प्रयोगशाळा होते. पण जेवणात अथवा आहारात या नैसर्गिक पदार्थाचा सातत्याने वापर केल्यास शारीरिक थकवा दूर होईल. तुम्हाला तरतरी आल्यासारखे वाटेल. शारीरिक दुर्बलता कमी होईल. मानसिकदृष्ट्या प्रसन्न वाटेल. विशेष म्हणजे त्यासाठी तुम्हाला फार मोठी रक्कम ही खर्च करण्याची गरज नाही. भाजीपाला मंडईत, बाजारात हे कंदमुळ तुम्हाला सहज उपलब्ध होईल.
बीट रूट
बीट हे शरीरातील अनेक व्याधी, आजार दूर पळवण्याचा रामबाण उपाय आहे. दारावर भाजीपाला विक्रेत्याकडे बीट हमखास सापडेल. भाजीपाला बाजारातही ते मिळते. बीटमध्ये अनेक आयुर्वेदिक गुण आहेत. बीटमध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फोरस, प्रथिने, जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात सापडतात. शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी बीट हे सर्वात चांगले आहे. बीटाचा रस पिल्यास शरीरात ऊर्जा मिळते. ताकद येते. ताजेतवाने वाटते. बीट हे शरीरासाठी पोषक आहे.
बीट ज्यूस पिल्याने शरीरात कॅल्शियम, फॉस्फोरस, व्हिटामीनची कमतरता दूर होते. रक्तातील लोहाचे प्रमाण झपाट्याने वाढते. सतत बीटचा वापर आहारात केल्यास अनेक शारीरिक व्याधी दूर होतात. अंगदुखीत आराम पडतो. सांधेदुखीत तर मोठा आराम पडतो.
जर सलग एक महिना बीटाचा वापर केला तर शरीरातील रक्ताचा प्रवाह वाढतो. शरीरातील घाण स्वच्छ होण्यास मदत होते. रक्ताचा प्रवाह सुधारतो. चांगल्या गतीने संपूर्ण शरीरात रक्ताचा संचार होतो. रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे शरीरातील नस मोकळ्या होतात. तुम्हाला दिवसभर तरतरी जाणवते.
बीटाचा रोजच्या जेवणात, आहारात वापर केल्यास शारीरिक दुर्बलता कमी होण्यास मोठी मदत होते. यामधील आर्यन, फॉस्फोरस, कॅल्शियम, जीवनसत्त्वे भूक वाढवण्यास मदत करतात. शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे काही दिवसताच थकवा कमी होतो. प्रसन्न वाटते. ताजेतवाने वाटते.
विशेष सूचना : ही केवळ सर्वसामान्य माहिती आहे. टीव्ही ९ त्याला दुजोरा देत नाही. तुमच्या आहार तज्ज्ञाचा, डॉक्टराचा सल्ला आवश्यक घ्या.