SEBI New Chairman Tuhin Kanta Pandey: मोदी सरकारच्या अर्थ मंत्रालयाचे सचिव तुहिन कांत पांडे यांची सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया चे म्हणजे सेबीच्या (SEBI) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने गुरुवारी रात्री ही नियुक्ती जाहीर केली आहे. मंत्रिमंडळाच्या निवड समितीचे पांडे यांनी सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तीन वर्षांसाठी ते या पदावर राहतील. माधवी पुरी बुच यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पांडेय हे 1987 च्या बॅचचे ओडिशा केडरचे वरिष्ठ आयएएस अधिकारी आहेत. सप्टेंबरमध्ये 2024 त्यांनी अर्थमंत्रालयाच्या सचिवपदाची जबाबदारी स्वीकारली होती.
पांडे हे उद्यापासून (शनिवार) पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत, याबाबतची माहिती केंद्र सरकारने प्रसिद्ध केली आहे. 1987 बैचचे सनदी अधिकारी असलेले पांडे हे अर्थमंत्रालय सांभाळणारे सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत.
अर्थ मंत्रालयाचा महत्वाचा विभाग असलेल्या डीआईपीएएमचे ते अनेक वर्ष सचिव होते. सार्वजनिक क्षेत्रातील आर्थिक कंपन्यांबाबत अनेक महत्वाचे निर्णय या विभागाकडून घेण्यात येतात.
संजय मल्होत्रा यांची भारतीय रिजर्व बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाल्यानंतर पांडे यांची 9 जानेवारी रोजी या विभागात नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी 2025-26 च्या केंद्रीय बजेट तयार करण्याची महत्वाची भूमिका घेतली होती. मध्यमवर्गाला त्यांनी १ लाख कोटी रुपयांचे कर सवलत दिली आहे. नव्या आयकर विधेयकाचा मसुदा तयार करण्यात त्यांचा समावेश होता.