Maharashtra Politics News live : मोठी बातमी! मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याचा पाकिस्तानी नंबरवरून धमकीचा मेसेज
Sarkarnama February 28, 2025 10:45 PM
Maharashtra CM Office threatening message : वरळी पोलिसांत गुन्हा दाखल

मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करणार असा पाकिस्तानी नंबरवरून वाहतूक पोलिसांना व्हाट्सअपवर धमकीचा मेसेज आला आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी दुपारी हा धमकीचा मेसेज आला आहे. त्यानंतर तपास यंत्रणा अलर्ट सतर्क झाली आहे. मालिक शहाबाज हुमायून राजा देव असं धमकी देणाऱ्याचं नाव आहे.

Swargate Rape case : दत्ता गाडेला आज कोर्टात हजर करणार

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला अटक केल्यानंतर त्याची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. थोड्याच वेळात त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे.

Dattatray Gade arrest : पाणी पिण्यासाठी गेला आणि गाडे पोलिसांच्या जाळ्यात अडकला

स्वारगेट येथे बलात्काराचे कृत्य केल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे गुणाट (ता.शिरुर) येथील त्याच्या गावातील शेतात लपला. शेताशेजारी असलेल्या कॅनॉलमध्ये तो लपून बसला होता. त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता. मात्र, पोलिसांनी मोबाईल स्ट्रेस करत त्याचं शेवटचे लोकेशन शोधलं आणि आरोपीचा शोध घ्यायला सुरूवात केली.

यावेळी काही लोकांनी तो उसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, गुरूवारी दिवसभर तो पोलिसांना सापडला नाही. मात्र, गुरुवारी रात्री पावने बाराच्या सुमारास तहान लागल्याने तो एका घरात पाणी पिण्यासाठी गेला. ज्या घरात तो पाणी पिण्यासाठी गेला होता त्या महिलेने फोन करून पोलिसांना आरोपीबाबतची माहिती दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

Swargate Rape Case news : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अटक

पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी अखेर मध्यरात्री अटक केली आहे. गुनाट (ता.शिरुर) येथील त्याच्या गावी असलेल्या कॅनॉलमध्ये लपून बसलेल्या नराधम आरोपीला गावकऱ्यांच्या मदतीने पुणे पोलिसांनी अटक केली. आज पुणे न्यायालयात आरोपीला सकाळी अकरा वाजता हजर केलं जाणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.