विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पक्षसंघटनेची नव्याने बांधणी करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये अनेक राज्यासह राष्ट्रीय स्तरावरील तरुण चेहऱ्यांना संधी दिली जात आहे.
तरुण चेहऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार फहाद अहमद यांच्यावर शरद पवारांनी राष्ट्रीय पातळीवरील एक मोठी जबाबदारी सोपवली आहे.
शरदचंद्र पवार पक्षाचे युवक आघाडीच्या राष्ट्रीय 'अध्यक्षपदी' फहाद अहमद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जाणून घेऊयात त्याची कारर्कीद...
2017 ते 2018 मध्ये त्यांनी अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थाची फी माफ व्हावी यासाठी 100हून अधिक टीआयएसएस विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस म्हणून आंदोलनाचे नेतृत्व केले.
2022मध्ये त्यांनी अबू आझमी आणि रईस शेख यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यांनी समाजवादी युवा सभेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हणून कामकाज करत राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.
2024ला समाजवादी पक्षाला रामराम करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
2024 ला त्यांनी महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकीटावर अणुशक्तीनगर या मतदारसंघातून लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
16 फेब्रुवारी 2023 ला फहाद अहमद यांनी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिच्याशी लग्न केले.