आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील 10 व्या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने होते. हा सामना लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. मात्र पावसामुळे आणि ओल्या खेळपट्टीमुळे सामन्याचा निकाल लागू शकला नाही. पाऊस आणि ओली खेळीपट्टी यामुळे सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे सामना रद्द करण्यात आला. परिणामी दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. मात्र या सामन्यानंतर यजमान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची क्रिकेट वर्तुळात नाचक्की झाली आहे.
अफगाणिस्ताने 50 ओव्हरमध्ये ऑलआऊट 273 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 274 धावांचं आव्हान मिळालं. ऑस्ट्रेलियाने 12.5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 109 धावा केल्या. मात्र त्यानंतर पावसाने खोडा घातला. त्यामुळे सामना थांबवण्यात आला. पावसाने जोरदार बॅटिंग तकेली.त्यानंतर पाऊस थांबला. ग्राउंड स्टाफकडून खेळपट्टी आणि मैदान पुन्हा कोरडं करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मात्र खेळपट्टी आणि मैदान खेळण्यापुरते कोरडं होऊ शकलं नाही.
मैदान कोरडं करण्यासाठी ग्राउंड स्टाफकडून चक्क स्पंजचा वापर करण्यात आला. ग्राउंड स्टाफने स्पंजद्वारे पाणी जमा करण्याचा प्रयत्न केला. यावरुन नेटकऱ्यांनी यजमान पाकिस्तान क्रिकेट बोर्डला चांगलंच ट्रोल केलं आहे. नेटकऱ्यांना या मुद्द्यामुळे पाकिस्तानला ट्रोल करण्याचं आणखी एक निमित्त मिळालं. नेटकऱ्यांनी पीसीबीची मीम्स शेअर करत फिरकी घेतली. पाऊस थांबल्याच्या बऱ्याच वेळेनंतरही जर खेळपट्टी आणि मैदान कोरडं करण्यासाठी काही ठोस यंत्रणा नसेल, तर यजमान म्हणून पाकिस्तानचं हे अपयश आहे. असंही नेटकऱ्यांकडून म्हटलं जात आहे.
नेटकरी काय म्हणतायत?
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस, ॲलेक्स केरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा आणि स्पेन्सर जॉन्सन.
अफगाणिस्तान प्लेइंग इलेव्हन : हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, सेदिकुल्ला अटल, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, रशीद खान, नूर अहमद आणि फजलहक फारुकी.