सचिन तेंडुलकरसोबत तुलना होणारा पाकिस्तानचा ‘हा’ स्फोटक फलंदाज बनला मौलवी, सहकाऱ्याचेही केले धर्मपरिवर्तन
GH News March 01, 2025 10:08 PM

भारताचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर याने 1989 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सचिन आपल्या धमाकेदार खेळीमुळे क्रिकेटचा देव बनला. त्याने एकामागे एक विक्रम केले. 1990 च्या दशकात सचिन तेंडुलकर याच्या फलंदाजीची तुलना पाकिस्तानच्या एका खेळाडूसोबत होत होती. त्या खेळाडूने 1997 पर्यंत 14 शतके केली होती. सचिन तेंडुलकरने 12 शतके केली होती. त्याची सरासरीसुद्धा सचिन तेंडुलकरपेक्षा जास्त होती. एकदिवशी सामन्यात 194 अशी सर्वाधिक धावसंख्या करण्याचा विक्रम त्याच्या नावावर होता. त्यानंतर तो मोडला गेला. त्याची तुलना वेस्ट इंडिजचा खेळाडू ब्रायन लारासोबत होत होती. तो खेळाडू आता मौलवी बनला आहे. त्याचे नाव आहे सईद अन्वर. त्याने आपल्या सोबत असणाऱ्या ख्रिश्चन सहकारी खेळाडूलाही इस्लाम धर्मात आणले.

क्रिकेटमधून निवृत्तीनंतर मौलवी

सईद अन्वर याने 2003 मध्ये विश्वचषक सामन्यात भारताविरुद्ध शतक केले होते. परंतु पाकिस्तान संघाचा पराभव झाला. त्यानंतरही त्याला संघातून वगळले. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने एकदिवशी सामन्यात 20 शतके केली आहेत. क्रिकेटमधील निवृत्तनंतर सईद अन्वर धार्मिक कार्याकडे ओढला गेले. त्याची सुरुवात त्याच्या मुलीच्या मृत्यूनंतरच झाली होती. सन 2001 त्याच्या मुलीचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला होता. यामुळे तो तबलिगी जमातमध्ये सामील झाला आणि इस्लाम धर्माचा प्रचार करू लागला. क्रिकेटमधून संन्यास घेतल्यावर अनेक खेळाडू कोचिंग करतात किंवा कमेंट्री करतात. परंतु अन्वरने वेगळा मार्ग निवडला. आता त्याचा आणि क्रिकेटचा काहीच संबंध नाही.

सहकारी खेळाडूला बनवले मुस्लीम

सईद अन्वर मौलवी झाल्यानंतर त्याचा इस्लामवर प्रभाव अधिक झाला. तो आपल्या सोबत असणाऱ्या इतरांना इस्लामचे महत्व सांगू लागला. पाकिस्तानचा क्रिकेटर मोहम्मद युसूफ त्याचे पूर्वी नाव यूसुफ योहाना होते. तो ख्रिश्चन धर्मात होता. त्याला 2004 मध्ये इस्लाम धर्मात आणले. त्याचा खुलासा युसूफ यानेच एका मुलाखतीत केले होते. तो म्हणाला होतो, ‘सईद भाई ने मुझे कलमा पढ़वाया। इसके बाद मौलवी फहीम साहब से मुलाकात करवाई’

सईद अन्वर याने 1989 मध्ये एनईडी विद्यापीठातून पदवी घेतली. तो इंजिनिअर आहे. पाकिस्तानमधील तबलिगी जमातसोबत इस्लामच्या शिकवणुकीसाठी त्याने आपले जीवन समर्पित केले. त्याने लाहोरमध्ये आपला माजी सहकारी खेळाडू वसीम अक्रमची पत्नी हुमा अक्रम यांच्या अंत्यसंस्कारासाठी प्रार्थना केली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.