या घटनेचा व्हिडिओ शेजारच्या इमारतीतील दुसऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यात संशयित एका मोटारीमधून पळून जाताना दिसले आणि त्या गाडीची नंबर प्लेटही दिसली आहे.
बंगळूर : सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे (Black Spray) मारून चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम मशीन कापली आणि त्यामधील लाखो रुपये घेऊन पळ काढला. शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास होस्कोट (जि. बंगळूर ग्रामीण) येथील सुलिबेले येथील स्टेट बँकेच्या (State Bank ATM Machine) ही घटना घडली.
यामध्ये आंध्रप्रदेशचा नोंदणी क्रमांक असलेल्या मोटारीमधून आलेल्या दरोडेखोरांनी एटीएम मशीन कापण्यासाठी कारमधील गॅस कटरचा वापर केला, त्यातून १० लाखांहून अधिक रुपये लुटले आणि पळून गेले. ओळख पटू नये म्हणून त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा रंग फवारला.
मात्र, या घटनेचा व्हिडिओ शेजारच्या इमारतीतील दुसऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यात संशयित एका मोटारीमधून पळून जाताना दिसले आणि त्या गाडीची नंबर प्लेटही दिसली आहे. मात्र, आरोपींनी चोरीचे वाहन वापरले असावे व ही एक व्यावसायिक टोळी असावी, असा पोलिसांना संशय आहे.