IND vs AUS : इंडिया-ऑस्ट्रेलिया सामन्यातून तिघांचं पदार्पण, टीमकडून सोशल मीडियावरुन माहिती
GH News March 03, 2025 06:13 PM

टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडवर 44 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने श्रेयस अय्यरच्या 79 धावांच्या जोरावर 50 ओव्हरमध्ये 249 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर टीम इंडियाने या धावसंख्येचा यशस्वीरित्या बचाव केला. वरुण चक्रवर्ती याने सर्वाधिक 5 विकेट्स घेत न्यूझीलंडला 45.3 ओव्हरमध्ये 205 धावांवर गुंडाळण्यात निर्णायक भूमिका बजावली. टीम इंडियाच्या या विजयानंतर उपांत्य फेरीत कोणता संघ कुणाविरुद्ध खेळणार? हे स्पष्ट झालं. त्यानुसार 5 मार्च रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात उपांत्य फेरीतील दुसरा सामना होणार आहे. तर 4 मार्चला टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीत पोहचण्यासाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे.

उपांत्य फेरीतील सामन्याआधी बधीर क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे.नवी दिल्लीत टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या बधीर क्रिकेट संघांमध्ये टी 20i ट्राय सीरिजचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीत 2 ते 8 मार्च दरम्यान या ट्राय सीरिजचा थरार रंगणार आहे.रविवारी 3 मार्च रोजी टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना पार पडला. ऑस्ट्रेलियाकडून या सामन्यातून एकूण 3 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन देण्यात आली आहे. अँगस पीक, हिमथ परेरा आणि जेक फ्लॉइड या ऑस्ट्रेलियाच्या युवा त्रिकुटांना पदार्पणाची संधी मिळाली.

ऑस्ट्रेलियाकडून तिघांचं पदार्पण

टीम इंडियाचा विजय

दरम्यान टीम इंडियाने या सामन्यात ऑस्ट्रेलियावर एकतर्फी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 94 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 1 विकेट गमावून सहज पूर्ण केलं. टीम इंडियाकडून आकाश सिंह याने सर्वाधिक धावा केल्या आकाशने 35 बॉलमध्ये नॉट आऊट 59 रन्स केल्या.

त्रिसदस्यीय टी 20i मालिकेसाठी भारतीय बधीर संघ : वीरेंद्र सिंह (कर्णधार), उमर अशरफ (विकेटकीपर), अभिषेक सिंह, आकाश सिंह, यशवंत नायडू, संजू शर्मा, संतोष कुमार मोहपात्रा, कुलदीप सिंह, विवेक कुमार, सुदर्शन ई, कृष्णा गौड़ा-विकेटकीपर , एम श्रमीत, सिबुन नंदा, अंकित जांगिड आणि शरीक मजीद.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.