Oscar Award 2025: AND THE BEST PICTURE AWARD GOES TO ... अनोरा सिनेमाचा ऑस्करमध्ये डंका
esakal March 03, 2025 05:45 PM
AND THE BEST PICTURE AWARD GOES TO ... अनोरा सिनेमाचा ऑस्करमध्ये डंका

अनोरा या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला. या सिनेमाने तब्बल पाच पुरस्कार मिळाले आहेत. तर सहा पुरस्कारांचं नामांकन या सिनेमाला होतं.

आणि ऑस्करची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली.....

अनोरा सिनेमासाठी अभिनेत्री मायकी मॅडिसनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तिचा हा पहिला ऑस्कर पुरस्कार आहे.

आईच्या वाढदिवशी पुरस्कार मिळाल्याचा आनंद - दिग्दर्शक शॉन बेकर

अनोरा सिनेमाचा दिग्दर्शक शॉन बेकरने आज तीन ऑस्कर पुरस्कार पटकावले. अवॉर्ड मिळाल्यानंतर केलेल्या भाषणात शॉनने आज त्याच्या आईचा वाढदिवस असल्याचं सांगितलं आणि तिन्ही पुरस्कार त्याच्या आईला समर्पित केले.

शॉन बेकरची ऑस्कर हॅट्ट्रिक ; मिळाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार

अनोरा सिनेमासाठी दिग्दर्शक शॉन बेकरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. आजच्या पुरस्कार सोहळ्यात त्याला मिळालेला हा तिसरा ऑस्कर आहे.

द पियानिस्ट नंतर 22 वर्षांनी अँड्रियन ब्रॉडीने पुन्हा एकदा पटकावला ऑस्कर

अभिनेता अँड्रियन ब्रॉडीला द ब्रूटलिस्ट सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

सर्वोत्कृष्ट संगीत पुरस्कार

डॅनियल ब्लूमबर्ग यांना ब्रूटलिस्ट सिनेमासाठी बेस्ट ओरिजिनल स्कोर हा पुरस्कार मिळाला.

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म

ब्राझीलच्या आय एम स्टील हिअर सिनेमाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर फिल्मचा पुरस्कार मिळाला.

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर पुरस्कार

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार लोल क्राऊली यांना ब्रूटलिस्ट या सिनेमासाठी मिळाला.

अनुजाची निराशा... 'या' शॉर्ट फिल्मला मिळाला ऑस्कर

आय एम नॉट अ रोबोट या सिनेमाला सर्वोत्कृष्ट लाईव्ह शॉर्ट फिल्म हा पुरस्कार मिळाला. ऑस्करसाठी निवड झालेली भारतीय शॉर्ट फिल्म अनुजा सिनेमाची यावेळी निराशा झाली.

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्टस

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्टसचा पुरस्कारही यंदा ड्यून पार्ट टूला मिळाला.

सर्वोत्कृष्ट ध्वनी

ड्यून पार्ट टूने सर्वोत्कृष्ट ध्वनी हा पुरस्कार पटकावला.

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन

वीकेड सिनेमाला सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईनचा पुरस्कार मिळाला.

बेस्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्म

नो अदर लँडने बेस्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्मचा पुरस्कार पटकावला.

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म

द गर्ल इन द ऑर्केस्ट्राला द बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म हा पुरस्कार मिळाला.

सर्वोत्कृष्ट गाणं

एमिलीया पेरेझ सिनेमातील ‘El Mal गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाण्याचा पुरस्कार मिळाला. क्लेमेंट ड्युकोल, कॅमिल आणि जॅक ऑडियर्ड यांनी हे गाणं बनवलं आहे.

आणि ती ढसाढसा रडली

एमिलीया पेरेझ सिनेमातील उत्तम अभिनयासाठी झो साल्दानाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार जाहीर होताच ती पळत स्टेजवर गेली. पुरस्कार स्वीकारताना अभिनेत्री ढसाढसा रडली.

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री

एमिलिया पेरेझ सिनेमातील उत्तम भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री झो साल्दानाला ऑस्कर मिळाला.

सर्वोत्कृष्ट संकलन

सर्वोत्कृष्ट संकलन म्हणजेच बेस्ट एडिटिंगचा पुरस्कार अनोरासाठी पुन्हा एकदा शॉन बेकरला देण्यात आला.

सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअर स्टायलिंग

THE SUBSTANCE सिनेमाने सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअर स्टायलिंगचा पुरस्कार पटकावला.

बेस्ट ॲडॅप्टेड स्क्रीनप्ले

पीटर स्ट्रगन यांना कॉन्क्लेव्ह सिनेमासाठी बेस्ट अडॅप्टेड स्क्रीनप्ले हा पुरस्कार देण्यात आला.

बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले पुरस्कार

अनोरा सिनेमासाठी शॉन बेकर यांना बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले पुरस्कार देण्यात आला.

सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर

पॉझ टोझवेलला  सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फिचर फिल्म

FLOW या सिनेमाला सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फिचर फिल्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या पुरस्काराचा मानकरी ठरला...

कियरन कल्किन या अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अ रिअल पेन सिनेमासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला.

अनुजा शॉर्ट फिल्मचं मराठी कनेक्शन

अनुजा शॉर्ट फिल्ममध्ये मराठी अभिनेते नागेश भोसले यांनी काम केलं आहे. या सिनेमात ते खलनायकाच्या भूमिकेत आहेत.

ही भारतीय शॉर्ट फिल्म ऑस्करच्या शर्यतीत

द एलिफन्ट व्हिस्परर या शॉर्ट फिल्मसाठी ऑस्कर जिंकणारी निर्माती गुनीत मोंगाची अनुजा ही शॉर्ट फिल्म ऑस्करच्या शर्यतीत आहे. या शॉर्ट फिल्मला सर्वोत्कृष्ट लघुपट (लाइव्ह अॅक्शन) या श्रेणीत नॉमिनेशन मिळालं आहे.

हे आहेत ऑस्करचे सूत्रसंचालक

प्रसिद्ध विनोदी अभिनेते, सूत्रसंचालक आणि पॉडकास्टर ब्रायन यंदा ऑस्कर अवॉर्डचं सूत्रसंचालन करणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.