मळगाव वाचनालयातर्फे
रविवारी विविध कार्यक्रम
बांदा, ता. ३ ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मळगाव येथील (कै.) उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरमध्ये रविवारी (ता. ९) सायंकाळी ४ वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
यशवंती धोंडू खानविलकर-पटेकर स्मृतीप्रित्यर्थ उज्ज्वला यशवंतराव खानविलकर पुरस्कृत आयोजित कार्यक्रमात मळगाव गाव मर्यादित महिलांसाठी पाककृती स्पर्धा होणार आहे. प्रथम नोंदणी करणाऱ्या वीस महिलांना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. ‘नाचणीपासून बनविलेला पदार्थ’ हा विषय आहे. इच्छुक महिलांनी वाचनालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन ग्रंथालयाच्या कार्यकारी मंडळाने केले आहे. या पाककौशल्य स्पर्धेसोबतच महिला दिनानिमित्त मळगावच्या स्नुषा सौ. रुपाली गुडेकर, अनमोल प्रभाग संघाच्या व्यवस्थापकांना ‘उमेद’च्या कार्यात विषेश अतिथी म्हणून प्रजासत्ताक दिनी निमंत्रित करून सन्मानित केल्याबद्दल प्रमुख अतिथींच्या हस्ते वाचन मंदिरतर्फे सन्मानित करण्यात येणार आहे.