आजकाल सर्वांनाच निरोगी काळे भोर आणि दाट केस हवे असतात. परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुमचे केस ड्राय आणि खराब दिसू लागतात. केसांची योग्य काळजी घेतल्यामुळे तुमचे केस अधिक चमकदार आणि दाट होतात. बदलत्या ऋतूमध्ये तुमच्या शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात. शरीरातील हार्मोन्स असंतुलित झाल्यावर त्याचा तुमच्या आरोग्यावर आणि केसांवर गंभीर परिणाम दिसून येतो. वातावरणातील आद्रतेमुळे तुमचे केस ड्राय आणि निर्जिव दिसू लागतात. कोरड्या केसांमुळे अनेकदा स्प्लिटेंड्सच्या समस्या उद्भवू शकतात. स्प्लिटेंड्सच्या समस्या उद्भवल्यामुळे केसांची वाढ होत नाही आणि केसांमध्ये गुंता होऊ शकतो.
केसांमध्ये गुंता झाल्यामुळे केसगळतीची समस्या देखील होऊ शकते. केसांची योग्य काळजी नाही घेतल्यामुळे कोंड्याच्या समस्या उद्भवू शकतात. केसांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही अनेक उपाय करता. पार्लरमध्ये अशा अनेक ट्रिटमेंट उपलब्द आहेत ज्यांच्यामुळे तुमच्या केसांना नैसर्गिक चमक मिळते. पंरतु या ट्रिटमेंटच्या दरम्यान केसांवर अनेक रसायनिक पदार्थांचा वापर केला जातो. या रसायनिक पदार्थांमुळे केसांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
स्प्लिटेंड्सच्या समस्या रोखण्यासाठी अनेकजण वारंवार केस कापतात परंतु हा त्यावरचा उपाय नाही. जर तुम्ही देखील स्प्लिटेंड्सच्या समस्यांमुळे त्रस्त आहात तर काही सोप्या आणि घरगुती उपायांमुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. हे उपाय केल्यामुळे तुमच्या स्प्लिटेंड्सच्या समस्या तर दूर होतीलच परंतु तुमचे केस देखील निरोगी राहाण्यास मदत होईल. कोरड्या आणि दुभंगलेल्या केसांचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याच्यामध्ये मॉइश्चरायझेशनची कमतरता. केस निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी, त्यांना योग्यरित्या मॉइश्चरायझ करणे महत्वाचे आहे. यासाठी आठवड्यातून किमान दोनदा तेल लावा. जर तुमचे केस खूप कोरडे असतील तर कोमट नारळ, बदाम किंवा आर्गन ऑईल लावा. केस धुण्यापूर्वी, टाळू आणि केसांच्या लांबीवर हलके तेल लावा. केसांना खोल पोषण मिळेल आणि बराच काळ ओलावा टिकून राहील यासाठी हेअर मास्क वापरण्याची खात्री करा. स्ट्रेटनर, कर्लर किंवा ब्लो-ड्रायरचा वारंवार वापर केल्याने तुमच्या केसांमधील मॉइश्चरायझेशन कमी होतं. म्हणून, केसांच्या स्टाइलिंग टूल्सचा वापर शक्य तितका कमी करा. आवश्यक असल्यास, गरम साधने वापरण्यापूर्वी उष्णता संरक्षणात्मक स्प्रे लावा. तसेच केसांना रंग देणे, रिबॉन्डिंग करणे किंवा केमिकल ट्रीटमेंट करणे टाळा कारण यामुळे केस कमकुवत होऊ शकतात.
केसांचे आरोग्य केवळ बाह्य काळजीवर अवलंबून नाही, तर पोषण देखील तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी तुमच्या आहारात प्रथिने आणि जीवनसत्त्वे समृद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश करा. डाळी, हिरव्या भाज्या, सोयाबीन, अंडी, काजू आणि ताजी फळे खा. केसांना हायड्रेट ठेवण्यासाठी शक्य तितके जास्त पाणी प्या. चुकीच्या पद्धतीने केस धुणे आणि वाळवणे देखील स्प्लिट एंड्सची समस्या वाढवू शकते. अनेकदा लोक केसांना जोरात घासून धुतात, पण असे केल्याने केस कमकुवत होतात. केसांची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी नेहमी सल्फेट-मुक्त शाम्पू आणि कंडिशनर वापरा. जेव्हा तुमचे केस पूर्णपणे कोरडे असतील तेव्हाच ते विंचरा कारण ओले केस जास्त तुटतात.