अनेकवेळा तुम्ही जेव्हा समोरच्याशी काही तरी महत्त्वाचं बोलायला जाता. त्यावेळी तो व्यक्ती अस्वस्थ होऊन तुमच्या पासून काही अंतर ठेऊ लागतोय का? त्याचे मुख्य कारण तुम्हाला माहिती आहे का? त्या व्यक्तीला तुमच्या तोंडातून दुर्गंधी येत असेल. त्यामुळे तो तुमच्या पासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असेल. तुम्ही दररोज सकाळी नियमित ब्रश करता. तरी देखील तुमच्या तोंडातून दुर्गंधीची समस्या येत आहे का? त्याचे मुख्य कारण तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया. तोंडातून दुर्गंधी येण्याचे मुख्य कारण म्हणजे खराब ओरल हायजीन, वेळेवर ब्रश न करणे, तोंड योग्यरित्या स्वच्छ न करणे.
श्वाससाच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी अनेकजण माउथ फ्रेश्नरचा वापर करतात, वेलची खातात, बडीशेप चगळतात. परंतु काही काळानंतर पुन्हा तोंडातून दुर्गंधी येण्यास सूरूवात होते. तुम्हाला माहिती आहे का स्वयंपाकघरातील काही वस्तू वापरून तुम्ही घरच्या घरी माऊथ फ्रेशनर बनवू शकता. मार्केटमधील माऊथ फ्रेशनरमध्ये रसायनिक पदार्थांचा वापर केला जातो ज्याळे ओरल कर्करोहाची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही या सोप्या ट्रिक्स वापरून घरीच माऊथ फ्रेशनर बनवा. तुम्ही तुळशीच्या पानांपासून माउथ फ्रेशनर बनवू शकता. यामुळे केवळ तोंडाची दुर्गंधी दूर होत नाही तर तोंडाचे आरोग्य सुधारण्यासही मदत होते.
तुळस आणि लवंग – तुम्ही तुळस आणि लवंगापासून माउथ फ्रेशनर बनवू शकता. तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासोबतच, या माऊथ फ्रेशनरमुळे तोंडातील बॅक्टेरिया देखील मारते. सर्वप्रथम 10-15 तुळशीची पाने नीट धुवा आणि वाळवा. यानंतर, त्यांना हलकेच कुस्करून घ्या आणि त्यात 4-5 लवंगा मिसळा. हा माऊथ फ्रेशनर तुम्ही दिवसातून 2-3 वेळा चावल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते आणि दातही मजबूत होतात.
तुळस आणि पुदीना – तुम्ही तुळस आणि पुदिन्यापासून प्रभावी माउथ फ्रेशनर देखील बनवू शकता. दोघेही त्यांच्या थंड स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांनी सांगितले की, यासाठी तुळस आणि पुदिन्याची 10-12 पाने बारीक करा आणि त्यात अर्धा चमचा मध घाला. ते लहान बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा आणि गोठवा आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला तोंडातून दुर्गंधी येईल तेव्हा त्याचा तुकडा तोंडात घाला. यामुळे केवळ ताजेपणाच मिळणार नाही तर तोंडाचे आरोग्यही सुधारेल.
तुळस आणि वेलची – तुळस आणि वेलची मिसळून तुम्ही घरी एक उत्तम नैसर्गिक माउथ फ्रेशनर बनवू शकता. तुळशीची सुकी पाने बारीक करून वेलची पावडरमध्ये मिसळा. आता हे मिश्रण हवाबंद डब्यात ठेवा आणि दिवसा गरज पडल्यास चिमूटभर चावून घ्या. यामुळे तोंडाची दुर्गंधी लगेच दूर होईल आणि तुम्हाला ताजेतवाने वाटेल.