मयूर राणे, साम टीव्ही
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठी भाषेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यांवरून राजकीय नेते आक्रमक झाले आहेत. मागील दोन-तीन महिन्यात परप्रातीयांनी मराठी कुटुंबीय, तरुणांना मारहाण केल्याचा घटना घडल्या आहेत. मुंबईतच मराठीची गळचेपी सुरु असताना मुंबईतील एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मुंबई आणि मराठी भाषेवर विधान केलंय. 'मुंबईत मराठी बोलता आलेच पाहिजे असं नाही, असं वक्तव्य सुरेश भैय्याजी जोशी यांनी केलंय.
मुंबईच्या विद्याविहार येथील एका कार्यक्रमात सुरेश भैय्याजी जोशी यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात जोशी यांनी वादग्रस्त विधान केलं. या कार्यक्रमात घाटकोपरची भाषा गुजराती आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आलेच पाहिजे असं नाही, असं वक्तव्य सुरेश भैय्याजी जोशी यांनी केलंय. भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याने नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
सुरेश भैय्याजी जोशी म्हणाले, मुंबईत एक नाही. तर मुंबईच्या अनेक भाषा आहेत. घाटकोपरची भाषा गुजराती आहे. मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठीत शिकलं पाहिजे असं नाही. मी मंगल प्रभात लोढा यांचे अभिनंदन करतो. आजच्या कार्यक्रमानंतर जामसाहेब यांचं सुद्धा नाव चर्चेत असेल. या ठिकाणी आल्यावर मला महाराणा प्रताप यांचं नाव डोळ्यासमोर आलं',
'महाराणा प्रताप आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या बद्दल आपण ऐकलं आहे. आपण ज्यांच्या बद्दल ऐकलं आहे, असे जाम साहेब सुद्धा आहेत. आपल्यातील अनेकांनी त्यांना पाहिलं आहे. ते कन्याकुमारी त्यांनी काम केलं आहे, असे जोशी म्हणाले.
'बिर्ला मंदिर अनेक ठिकाणी आहेत. बिर्ला यांनी अनेक मंदिर बांधले आहे. पण आतमध्ये देवता कोण आहे, त्यात जाऊन पहावं लागतं. काही लोक प्रत्येक प्रकल्पाला नाव दिले जातात. ती त्यांची ओळख आहे. मंगलप्रभात यांनी एक जबाबदारी उचलली होती. सगळ्या गोष्टी लक्षात घेत चांगलं काम झालं पाहिजे. आज काहीजण काही न करता नाव दिलं जातं. त्यांची प्रतिष्ठा कमी होती का, जीवनामध्ये सर्वजण चांगलं काम करतात, असे ते सुरेश भैय्याजी जोशी पुढे म्हणाले.
'चांगलं जीवन साधनेमधूनच प्राप्त होतं. अशा प्रकारचे मधुरता त्यांच्या बोलण्यात होती. जे राज्यासाठी साधनेच्या मार्गाने जातात, त्यानंतर मुख्य असतात. त्याने लोक थोडे रुखे सुखे असतात. ज्यांनी साधना फक्त भारतात करण्याचा संकल्प केला. त्यांचा प्रभाव हा हिंदू धर्म आणि भारतमाताच राहिला. हे कर्मशीलता फक्त एका कामासाठी नाही, तर असे हे जामसाहेब योगी म्हणून हसतात, असे भैय्याजी जोशी यांनी सांगितले.