भुवनेश्वर : मोबाईल फोनवर ऑनलाइन गेम खेळण्यास विरोध केल्याने तरुणाने आई-वडील आणि बहिणीची हत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.४) ओडिशातील जगतसिंगपूर जिल्ह्यात उघडकीस आली.
आरोपी सुरज्यकांत सेठी (वय २२) याला मोबाईल फोनवर ऑनलाइन गेम खेळण्यास त्याचे आई-वडील आणि बहिणीने विरोध केला होता. त्यामुळे रागाच्या भरात त्याने काल पहाटे तीन वाजता दगड किंवा अन्य जड वस्तूने मारहाण करून तिघांची हत्या केली.
घटनेनंतर पळून गेलेल्या सुरज्यकांत याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला मानसिक समस्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. आई-वडिलांची हत्या केल्याची कबुली सुरज्यकांतने दिल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहे.