विदेशी गुंतवणूकदारांनी या कंपनीचे विकले 1 कोटी 13 लाख शेअर्स, शेअर्समध्ये तेजी
ET Marathi March 06, 2025 05:45 PM
मुंबई : स्टरलाइट टेक्नॉलॉजीचे शेअर्स आज गुरुवारी ट्रेडिंग दरम्यान फोकसमध्ये आहेत. या मागे एक मोठी बातमी आहे. गोल्डमन सॅक्स ॲसेट मॅनेजमेंटने बुधवारी 84 कोटी रुपयांच्या खुल्या बाजारातील व्यवहारात अनिल अग्रवाल प्रवर्तक असलेल्या स्टरलाइट टेक्नॉलॉजीजमधील 2 टक्क्यांहून अधिक हिस्सा विकला. या घडामोडीनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.बीएसई आकडेनुसार, गोल्डमन सॅक्स ॲसेट मॅनेजमेंटने स्टरलाइट टेक्नॉलॉजीजमधील 2.13 टक्के हिस्सेदारी 1 कोटी 3 लाख शेअर्स त्यांच्या संलग्न गोल्डमन सॅक्स फंड - गोल्डमन सॅक्स इंडिया इक्विटी पोर्टफोलिओद्वारे विकले. कंपनीचा शेअर्स आज 2% वाढीसह 82.42 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला होता.शेअर्सची विक्री सरासरी 81.04 रुपये किमतीला झाली. या एकूण कराराची किंमत 84.10 कोटी रुपये आहे. दरम्यान, बंधन म्युच्युअल फंडाने स्टरलाइट टेक्नॉलॉजीजमधील 6.011 दशलक्ष शेअर्स किंवा 1.23 टक्के हिस्सा 48.69 कोटी रुपयांना विकत घेतला. शेअर्स सरासरी 81 रुपये प्रति शेअर या भावाने विकत घेतले गेले. स्टरलाइट टेक्नॉलॉजीचे शेअर्स गेल्या पाच दिवसांत 9% आणि एका महिन्यात 23% घसरले. शेअर्स सहा महिन्यांत 40% आणि या वर्षी आतापर्यंत 30% घसरला आहे. कंपनीचे शेअर्स एका वर्षात 40% घसरले. पाच वर्षांत त्यात 45% पर्यंत घट झाली. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च किंमत 155.25 रुपये आणि 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 78.90 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप 3,965 कोटी रुपये आहे.