Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील ही मालिका सध्या चर्चेत आहे. मालिकेत नंदिनी आणि पार्थचं लग्न न होता काव्या आणि पार्थचं लग्न झालं. तर नंदिनी आणि जीवाला नाईलाजाने लग्न करावं लागलं. मालिकेतील हा ट्विस्ट प्रेक्षक पचवत असतानाच आता मालिकेत आणखी एक रंजक वळण आलं आहे.
आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम असूनही त्यांना दुसऱ्याच व्यक्तीशी लग्न करावं लागल्याने दोघांनाही धक्का बसलाय. त्यातच काव्याला तिच्या मोठ्या बहिणीशीच जीवाचं लग्न झालंय हे कळल्यावर खूप त्रास होतो. तर पार्थही नंदिनीने लग्न केलं म्हणून नाराज आहे.
मालिकेच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळालं कि, काव्या नंदिनीला जीवाबरोबर घटस्फोट घ्यायला सांगते. तेव्हा नंदिनी स्पष्ट नकार देते. "जेव्हा कुणीच माझी साथ देत नव्हतं तेव्हा जीवा माझ्या पाठीशी उभा राहिला. त्याने माझ्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे जोपर्यंत तो स्वतःहून माझ्याकडे घटस्फोट मागत नाही तोपर्यंत मी त्याला घटस्फोट देणार नाही." असं उत्तर नंदिनी काव्याला देते. ज्यामुळे काव्याला धक्का बसतो.
मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षकही थक्क झाले आहेत. अनेकांनी या प्रोमोवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना हा प्रोमो आवडला तर काहींना हा प्रोमो अजिबात आवडला नाही. "लग्नानऺतर होईलच प्रेम.. सुऺदर कथानक.. लग्नानऺतरच खर आयुष्य सुरू होत.. नविन नाती नवी माणसं साऺभाळण हा फार मोठा टास्क असतो ... विशेषत: स्रियाऺसाठी ...पण आई आणि वडील याऺचे सऺस्कार ..प्रेम, त्याग,माया , समजूतदारपणा यामुळे त्या सऺसार सुखाचा आणि आनंदी.. यशस्वी करतात... सुऺदर अभिनय सगळ्यांचा खास करून नऺदीनी" असं कौतुक एकाने कमेंटमध्ये केलं आहे. "दोन बहिणीची वेगळी मत आहे एक आजच्या युगाची आणि दुसरी सर्व मिळून घेणारी " अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने "मालिकेत हे काय सुरु आहे. असं कधी प्रत्यक्षात घडतं का ?" असा प्रश्न विचारला आहे. तर एकाने "नंदिनीला का जगत्माता बनवताय ? हे खूप त्रासदायक आहे." अशी कमेंट केली आहे.
मालिकेचा हा विशेष भाग 8 मार्च 2025 ला प्रसारित होणार आहे. नंदिनीची बाजू काव्याला पटेल का ? या घटनेमुळे दोन्ही बहिणींमध्ये दुरावा येईल का ? या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.