वूमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेतील 16 व्या सामन्यात यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहेत. मुंबईचा हा या हंगामातील सहावा तर यूपीचा सातवा सामना असणार आहे. हरमनप्रीत कौर मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तर दीप्ती शर्मा हीच्याकडे यूपी वॉरियर्जचं नेतृत्व आहे. यूपीच्या तुलनेत मुंबईची स्थिती चांगली आहे. मुंबईने 3 सामने जिंकले आहेत. तर यूपीला 2 सामन्यातच विजयी होता आलं आहे. मात्र यूपीला गेल्या 2 सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. तर मुंबईलाही गेल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे दोन्ही संघांचा हा सामना जिंकून विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघात चांगली चढाओढ पाहायला मिळू शकते.
यूपी विरुद्ध मुंबई सामना गुरुवारी 6 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.
यूपी विरुद्ध मुंबई सामन्याचं आयोजन हे लखनऊमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
यूपी विरुद्ध मुंबई सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
यूपी विरुद्ध मुंबई सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पााहायला मिळेल. तर लाईव्ह सामन्याचा थरार मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवरुन पाहायला मिळेल.
यूपी वॉरियर्स वूमन्स टीम : दीप्ती शर्मा (कर्णधार), ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, जॉर्जिया वॉल, वृंदा दिनेश, श्वेता सेहरावत, उमा चेट्री (विकेटकीपर), चिनेल हेन्री, सोफी एक्लेस्टोन, गौहेर सुलताना, क्रांती गौड, राजेश्वरी गायकवाड, ताहलिया, ताहलिया मॅकग्रा, अलाना किंग, सायमा ठाकोर, अंजली सरवाणी, आरुषी गोयल आणि पूनम खेमनार.
मुंबई इंडियन्स वूमन्स टीम : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, सजीवन सजना, अमनजोत कौर, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, जिंतीमणी कलिता, शबनीम इस्माईल, सायका इशाक, पारुनिका सिसोदिया, कीर्तना बालकृष्णन, नदीन डी क्लर्क, क्लो ट्रायॉन, अमनदीप कौर आणि अक्षिता माहेश्वरी.