Health Tips : दररोज वरण भात खा आणि स्वस्थ राहा
Marathi March 07, 2025 04:25 PM

गरमा-गरम वरण त्यावर तुपाची धार ठेवत पोटभर जेवणारे आपणच नेहमीच पाहतो. वरण-भात हे आरोग्यासाठी सर्वौत्तम अन्न मानले जाते. अनेकांना तर रात्रीच्या जेवणात वरण भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखे वाटत नाही. कोणी आजारी असेल किंवा थकलेला असेल तर आवर्जून पटकन तयार होणारा पण पौष्टिक असणारा वरण भात खाण्यात येतो. पचायला हलका असलेल्या वरण भातात प्रोटिन, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन सी, ऍटीऑक्सिडंट आदी पोषकतत्वे असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे तज्ञमंडळी स्वस्थ राहण्यासाठी दररोज वरण-भात खाण्याचा सल्ला देतात.

  • वेट लॉसच्या प्रयत्नात असाल तर वरण भात खाऊ नये असे सांगितले जाते. पण, हे पूर्ण सत्य नाही. जर तुम्ही वेट लॉस डाएट फॉलो करत असाल तर आठवड्यातून दोन वेळा वरण-भात नक्कीच खाऊ शकता. वरण-भातामुळे पोट लवकर भरते. तुम्ही पांढऱ्या भाताऐवजी ब्राउन राइस खाऊ शकता.

  • वरण भात पचन क्रिेयेला आराम देते म्हणजेच वरणभात लवकर पचते. वरण बनवण्यासाठी तुरडाळ आणि मुगडाळ पचण्यास हलकी असते कारण यातील प्रोटिनला शरीर सहज शोषून घेते. याशिवाय भात पचवण्यास सोपा असतो. भातात कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
  • डाळ आणि भाताला संतुलित आहार म्हटले जाते. डाळींमध्ये असलेले प्रोटिन आणि तांदळातील कार्बोहायड्रेट्स शरीराला भरपूर ऊर्जा प्रदान करते. त्यामुळे दररोज वरण भात जरूर खायला हवा.

  • डाळ आणि भात हे प्रोटिन्सचे उत्तम स्त्रोत आहेत. जेव्हा तुम्ही डाळ भात खाता तेव्हा शरीरात अमीनो ऍसिडची कमतरता पूर्ण होते, जे संपूर्ण आरोग्य आणि स्नायूंसाठी फायदेशीर आहे.

हेही पाहा –

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.