तुम्ही NEET UG 2025 साठी अद्याप अर्ज केला नसेल तर घाई करा, कारण त्याची शेवटची तारीख 7 मार्च 2025 आहे. यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट अंडरग्रॅज्युएट (NEET UG) ची अर्ज प्रक्रिया बंद करेल. इच्छुक आणि पात्र उमेदवार neet.nta.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. 7 मार्च रोजी रात्री 11.50 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार असून शुल्क भरण्याची शेवटची तारीख आहे.
अर्जाची विंडो बंद झाल्यानंतर उमेदवारांना 9 मार्च ते 11 मार्च या कालावधीत आपल्या अर्जात दुरुस्ती करता येणार आहे. यानंतर 26 एप्रिलपर्यंत परीक्षेची सिटी स्लिप जारी केली जाईल आणि उमेदवार 1 मे पासून त्यांचे NEET UG 2025 परीक्षेचे प्रवेशपत्र देखील डाउनलोड करू शकतात.
NEET UG 2025 परीक्षेच्या तारखा
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : 7 फेब्रुवारी ते 7 मार्च 2025 (रात्री 11.50 वाजेपर्यंत)
शुल्क भरण्याची शेवटची तारीख : 7 मार्च 2025 (रात्री 11.50 वाजेपर्यंत)
अर्जात सुधारणा करण्याची तारीख : 9 मार्च ते 11 मार्च 2025
परीक्षा सिटी स्लिप जारी करण्याची तारीख : 26 एप्रिल 2025
ॲडमिट कार्ड जारी करण्याची तारीख: 1 मे 2025
परीक्षा दिनांक : 4 मे 2025
निकाल जारी दिनांक: 14 जून 2025 (संभाव्य)
NEET UG 2025 अर्ज शुल्क किती?
सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1700 रुपये, जनरल-ईडब्ल्यूएस, ओबीसी (नॉन क्रीमी लेयर) साठी 1600 रुपये आणि एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि थर्ड जेंडर उमेदवारांसाठी 1,000 रुपये अर्ज शुल्क आहे.
NEET UG 2025 साठी अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम NEET neet.nta.nic.in च्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
त्यानंतर होमपेजवरील ‘रजिस्ट्रेशन फॉर NEET UG 2025 2025’ लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर, आपले नाव, संपर्क माहिती आणि ईमेल सारखे मूलभूत तपशील लिहा, आपले खाते तयार करा.
आता क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा आणि वैयक्तिक तपशील, शैक्षणिक पात्रता आणि परीक्षा केंद्र निवडा.
NEET UG 2025 परीक्षा दिनांक आणि वेळ
NEET UG 2025 परीक्षा 4 मे 2025 रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत ही परीक्षा होणार असून एकूण कालावधी 180 मिनिटे म्हणजेच 3 तासांचा असेल.