Ajit Pawar : अर्थमंत्री अजित पवार अंतरिम अर्थसंकल्प मांडणार; शेतकरी, नोकरदार वर्ग आणि महिलांना काय मिळणार?
Saam TV March 10, 2025 08:45 AM

मुंबई : उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार हे आज सोमवारी राज्याचाअर्थसंकल्प सादर करणार आहेत. ते राज्याचा वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प आहे. आज अर्थमंत्री म्हणून अजित पवार हे अकरावा अर्थसंकल्प सादर करणार आहे.

अजित पवार आर्थिक शिस्तीचे कठोर प्रशासक म्हणून ओळखले जातात. ते जनमताची नाडी ओळखून आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पात लोकाभिमुख निर्णय जाहीर करताना राज्याच्या विकासप्रक्रियेला धक्का बसणार नाही याची काळजी घेतात का, हे पाहावे लागणार आहे. कोरोना काळात अनेक राज्यांची अर्थव्यवस्था अडचणीत असताना अजित पवार यांनी महाराष्ट्राची आर्थिक शिस्त बिघडू न देण्यासाठी प्रयत्न केले. त्याबद्दल त्यांच्या कार्याचा केंद्रीय पातळीवर गौरव झाला.

अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी, कष्टकरी, महिला, दलित, आदिवासी, विद्यार्थी, युवक हे घटक त्यांच्या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. 2021 चा अर्थसंकल्प 8 मार्च जागतिक महिला दिनी जाहीर केला होता. त्यामुळे त्यांनी तो राज्यातील महिला शक्तीला समर्पित केला होता.

2022 चा अर्थसंकल्प स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीदिनी 11 मार्च रोजी सादर केला होता. त्यामुळे त्यांनी तो छत्रपती संभाजी महाराज यांचं शौर्य, त्याग, समर्पण, स्वराज्यनिष्ठेला समर्पित केला होता. त्यांनी कृषी, उद्योग, दळणवळण, आरोग्य, मनुष्यबळ विकास या पंचसूत्रीवर आधारीत अर्थसंकल्पही त्यांनी सादर केलाय.

अजित पवार विक्रमाच्या वाटेवर

अर्थमंत्री अजित पवार सोमवारी त्यांचा अकरावासादर करतील. त्यानंतर ते शेषराव वानखेडे यांच्यानंतर (१३ वेळा) दुसरे सर्वाधिक (११) वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री ठरणार आहेत.

शेषराव वानखेडे यांनी 13 वेळा, अजित पवार यांचा आजचा म्हणाजे सोमवारचा अर्थसंकल्प धरून 11 वेळा, त्यांच्यानंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान जयंत पाटील (10 वेळा) आणि सुशीलकुमार शिंदे (9 वेळा) यांना जातो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.