रत्नागिरी एसटी आगारातून नवीन एसटी बसचे लोकार्पण कार्यक्रम राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून लांजा, राजापूर, देवरूख, रत्नागिरी या डेपोंना प्रत्येकी दहा बसेस मंजूर झाल्या आहेत.
त्यापैकी लांजा दोन, राजापूर पाच, रत्नागिरी दहा अशा 17 बसेस प्राप्त झाल्या असून याचा लोकार्पण सोहळा रत्नागिरीत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी मंत्री उदय सामंत यांनी स्वतः या बस मधून प्रवास केला व प्रवाशांच्या अडचणी जाणून घेतल्या.
Jalna: जालन्यात खवल्या मांजरीची तस्करी करणाऱ्या आरोपींना दोन दिवसाची वनकोठडीजालन्यात खवले मांजरीची तस्करी करणाऱ्या सहा आरोपींना वनविभागाने अटक केली असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसाची वनकोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी अद्याप तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहे.
दोन दिवसांपूर्वी वनविभागाच्याच अधिकाऱ्यांनी व्यापारी होत सापळारचून जालन्यातील मंठा चौफुली परिसरात कारवाई केली होती.
या कारवाईमध्ये तीन वाहनांसह सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.
या आरोपींना न्यायालयाने दोन दिवसाची वनकोठडी सुनावली आहे.
दरम्यान या खवल्या मांजरीचा वापर कश्यासाठी करायचा होता याची माहिती अद्याप समोर आली नाही.
Raigad: भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रायगडमध्ये क्रिकेट प्रेमींचा जल्लोषभारतीय संघाने न्यूझीलंड विरूध्द क्रिकेट सामन्यात दणदणीत विजय मिळवला.
या विजयाचा जोरदार जल्लोष रायगडमध्ये साजरा करण्यात आला.
महाड शहरातील छ. शिवाजी महाराज चौकामध्ये तिरंगा भगवे झेंडे फडकवत त्याच बरोबर फटाकांची आतिषबाजी आणि घोषणाबाजी करीत जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला.
Ambernath: अंबरनाथमध्ये सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाईअंबरनाथमधील सराईत गुन्हेगार फहाद उमर इंजिनिअर याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याची वर्षभरासाठी येरवडा जेलमध्ये रवानगी करण्यात आलीये.
त्याच्यावर २० पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्याची गुन्हेगारी कृत्य कमी होत नसल्यानं एक वर्षासाठी त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलीये.