बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा 'सूर्यवंशम' हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटाचे आजही चाहते दिवाने आहेत. 'सूर्यवंशम' चित्रपट तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन दुहेरी भूमिकेत आहे. 'सूर्यवंशम' हा चित्रपट 1999 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेत्री सौंदर्या (Soundarya ) पाहायला मिळाली.
सौंदर्या ही चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने हिंदी आणि साऊथच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र वयाच्या 31 व्या वर्षी सौंदर्याचे निधन झाले. विमान अपघातात सौंदर्याचा मृत्यू झाला. बंगळुरूमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान विमान अपघातात 17 एप्रिल 2004 रोजी सौंदर्याचा मृत्यू झाला. मात्र आता तब्बल 22 वर्षांनंतर सौंदर्याच्या मृत्यूबाबत नवीन खुलासा करण्यात आला आहे. मोठी अपडेट समोर आली आहे.
मोठा खुलासाआता असा खुलासा करण्यात आला आहे की, तिच्या मृत्यूच्या वेळी गरोदर होती. याच प्रकरणी टॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मोहन बाबू यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांच्यावर सौंदर्याच्या मृत्यूमध्ये त्यांचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. सध्या सोशल मीडियावर सौंदर्याचा नसून खून झाला अशी चर्चा रंगली आहे. अपघातानंतर सौंदर्याचा मृतदेहही सापडला नव्हता.
मालमत्तेचा वादसौंदर्या मृत्यूच्या दिवशी करीमनगरमध्ये भारतीय जनता पक्ष आणि तेलुगू देसम पक्षाच्या राजकीय प्रचार कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होती. या अपघातात तिच्या भावाचाही मृत्यू झाला. मीडिया रिपोर्टनुसार, मोहन बाबूसोबतच्या मालमत्तेच्या वादातून सौंदर्याचा खून झाला असे बोले जात आहे. तक्रारीमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, मोहन बाबू जमीन विकण्यासाठी त्या भावा बहिणीवर दबाव आणत होता. तक्रारदाराचे नाव चित्तमुल्ला असल्याचे सांगितले जाते. तसेच चित्तमुल्लाला मोहन बाबूमुळे जीवाला धोका असून त्याने पोलिस संरक्षण देखील मागितले आहे.