Leopard Video: दूध डेअरीत घुसून बिबट्याचा धुडगूस, लॅबमध्ये तोडफोड, काच फोडून ठोकली धूम
Saam TV March 12, 2025 08:45 PM

Ahilya Nagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता शहरात बिबट्याने थेट एका दूध डेअरीत प्रवेश करत धुडगूस घातल्याची घटना घडली आहे. बिबट्याच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून दूध डेअरीच्या लॅबमध्ये घुसून बिबट्याने उपकरणांची तोडफोड केली.

राहाता शहरातील पंचकृष्णा डेअरी येथे आज भल्या सकाळी सहा वाजेच्या दरम्यान बिबट्याचा थरार अनुभवायला मिळाला. परिसरात दोन बिबट्यांची झुंज सुरू असतानाच त्यातील एक बिबट्या थेट सुनील सदाफळ यांच्या मालकीच्या पंचकृष्णा दूध डेअरीत घुसला.

कुत्र्यांना चाहूल लागताच त्यांनी जोरात भुंकण्यास सुरुवात केली असता गेट जवळ झोपलेल्या सुरक्षा रक्षकाला जाग आली आणि समोर थेट बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्याच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. बिबट्याने डेअरीच्या लॅबमध्ये प्रवेश करत अनेक उपकरणांची (Vandalism) केली आहे.मात्र, बाहेर पडण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने बिथरलेल्या बिबट्याने कार्यालयाच्या दरवाजाच्या जाड काचेला धडका घेत काच फोडून बाहेर पळ काढला.

यावेळी बाहेर जमा झालेल्या लोकांवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न बिबट्याने केला. यात सुदैवाने कुणालाही इजा झाली नसली तरी सदाफळ यांच्या लॅबचे मोठे नुकसान झाले आहे. राहाता तालुक्यात (Leopard) मुक्त संचार वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

टीप: बिबट्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत ना

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.