बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी विश्वातील सतीश भोसले उर्फ खोक्या याला अखेर प्रयागराज येथून पोलीसांनी अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून तो पोलीसांच्या रडारवर होता, मात्र वारंवार ठिकाण बदलत असल्याने त्याला पकडणे कठीण जात होते. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे प्रयागराज येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, लवकरच त्याला बीड येथे आणले जाणार आहे.