कोलकाता नाइट रायडर्स कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपवण्याचं कारण की…! सीईओ वेंकी मैसूर म्हणाले..
GH News March 13, 2025 09:13 PM

आयपीएल स्पर्धेत गतविजेता राहिलेली कोलकाता नाईट रायडर्स संघ यंदा नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार आहे. श्रेयस अय्यरला रिलीज केल्यानंतर पंजाब किंग्सने त्याला मोठी रक्कम मोजून घेतलं. तसेच त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा टाकली. दुसरीकडे, मेगा लिलावात रिलीज केलेल्या वेंकटेश अय्यरला 23.75 कोटी रुपये देऊन संघात पुन्हा घेतलं. त्यामुळे वेंकटेश अय्यरच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवली जाईल असं वाटत होतं. पण भलतंच घडलं. अजिंक्य रहाणे पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिल्यानंतर दुसऱ्या फेरीत कोलकात्याने त्याला घेतलं. आता त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. पण याबाबत कोलकात्या संघाचे सीईओ वेंकी मैसूर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद सोपवण्याचं खरं कारण काय ते सांगितलं.

वेंकी मैसूर यांनी ईएसपीएलक्रिकन्फोशी बोलताना सांगितलं की, ‘आयपीएल एक मोठी स्पर्धा आहे आणि वेंकटेश आमचा प्रमुख मॅच विनर प्लेयर हे. पण त्याची गणना युवा खेळाडूंमध्ये केली जाते. आम्ही पाहिलं आहे की, स्पर्धा जशी पुढे जाते तशी आव्हान येतात. यासाठी शांत आणि संयमी कर्णधाराची आवश्यकता आहे. आमच्याकडे अजिंक्य रहाणे हा उत्तम पर्याय होता. तसेच आम्ही वेंकटेश अय्यरवर कोणताही अतिरिक्त भार टाकू इच्छित नव्हतो.’

‘आयपीएल स्पर्धेत अजिंक्य रहाणे पहिल्या पर्वापासून खेळत आहे. यात त्याने गरजेवळी कर्णधारपदाची भूमिका बजावली आहे. आयपीएलमध्ये 185 सामने खेळण्याचा त्याचा अनुभव आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 सामने खेळला आहे. त्यामुळे त्याच्याकडे चांगला अनुभव आहे. त्यामुळे त्याला कर्णधारपद सोपवल्याने आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.’, असंही त्यांनी पुढे सांगितलं. कोलकात्याचा आयपीएल 2025 स्पर्धेत पहिला सामना 22 मार्चला आरसीबीशी होणार आहे. हा सामना होमग्राउंडवर होणार आहे.

केकेआर आयपीएल 2025 संघ: अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, क्विंटन डी कॉक, रहमानउल्लाह गुरबाज, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, ॲनरिक नॉर्टजे, हर्षित राणा, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, रोव्हेन्स जॉन्सन, रोव्हेन्स, रोव्हेन्स, रोव्हेन्स , रोव्हेन्स, हर्षित राणा. सिसोदिया, अनुकुल रॉय, मोईन अली , उमरान मलिक.

जखमी खेळाडू: उमरान मलिक.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.