धुळ्यात तापमानाचा पारा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढला असून, वाढत्या उष्णतेच्या झळा नागरिकांना सहन करावा लागत आहे, आज धुळ्यात 39 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे, हवामान विभागातर्फे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, पुढील काही दिवस तापमानाचा पारा अशाच प्रकारे वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे,
त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, तसेच घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन देखील हवामान विभागाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.
खोक्या भोसलेला ट्रान्झिट रिमांड मिळाली, लवकरच बीडमध्ये आणलं जाणारखोक्या भोसलेला ट्रान्झिट रिमांड मिळाली
प्रयगराज न्यायालयाकडून मिळाली ट्रान्झिट रिमांड
खोक्या भोसलेला महाराष्ट्रत आणण्याचा मार्ग मोकळा
आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले लाथा बीड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सतीश उर्फ खोक्या भोसले ला बीड पोलीस आज तीन वाजता प्रयागराज मदन घेऊन महाराष्ट्रात येणार आहे.
सतीश उर्फ खोक्या भोसले ला उद्या शिरूर कासार न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या बैठकीनंतर घोषणाबाजी आणि गोंधळसंगमनेर शहरात नगर पालिकेमध्ये होती आढावा बैठक...
बैठकीनंतर निवेदन द्यायला आलेल्या छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी केली घोषणाबाजी...
नितेश राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी...
नितेश राणे यांचा राजीनामा घेण्याची मागणी...
घोषणाबाजी नंतर कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ...
महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केली आंदोलकांना धक्काबुक्की...
पालकमंत्री विखे पाटील यांच्या समोरच घडला प्रकार...
अचानक घडलेल्या घटनेने परिसरात गोंधळ...
राधाकृष्ण विखे पाटील यांचा आज होता संगमनेर मतदारसंघात दौरा...
Beed: जमिनीच्या वादातून कुटुंबाला बेदम मारहाण, बीडच्या कुमशी गावातील धक्कादायक प्रकारजमिनीच्या वादातून कुटुंबाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या कुमशी गावात उघडकीस आला आहे..
या मारहाणीचा व्हिडिओ ही समोर आला आहे..
यामुळे खळबळ उडाली असून जखमी वर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत..
जमिनीच्या वादातून 40-50 गुंड भाड्याने आणून लहान मुल,महिला,पुरुषांना जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला.यामध्ये भिसे कुटुंबातील तिघेजण जखमी आहेत.
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र ज्या पद्धतीने मारहाण करण्यासाठी काट्या कुराडीचां आणि धारदार शास्त्राचा वापर केला जात आहे.
त्यावरून या गुणांच्या टोळीवरती कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणात मारहाण झालेल्या अनिल भिसे या तरुणाने घडलेली आपबीती सांगितली.. दोन महिलांना देखील मारहाण केली असल्याचे सांगितले..
पुण्यातील हडपसरमधील सतीश वाघ खून प्रकरणी आरोपपत्र दाखलभाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आणि हडपसर मधील हॉटेल व्यवसाय सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात त्यांची पत्नी मोहिनी वाघ आणि मुख्य सूत्रधार अक्षय जावळकर यांच्यासह आरोपी विरोधात न्यायालयात 1 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
मोहिनी वाघच्या सांगण्यावरून सतीश वाघ यांचे अपहरण करून त्यांचा खून करण्याचा संपूर्ण कट अक्षय जावळकर यांनी कट रचला असे पोलीस तपासात उघड झाले आहे.
सतीश वाघ मॉर्निंग वॉकला कधी जायचे आणि त्याचा दिनक्रम कसा होता याची माहिती अक्षय जाधव पवन शर्मा नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे यांना देऊन वाघ यांच्या खुनाची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
या सर्व गुन्हेगारावर गुन्हे दाखल करण्यात आले होते अटक करण्यात आली होती.
त्यानुसार आता कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे..
स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर एसटी प्रशासन अलर्ट मोडवरया धक्कादायक घटनेनंतर बसस्थानकातील सुरक्षेचा अभाव समोर आला त्यामुळे आता विविध उपाययोजना केल्या जात आहेत
पुणे शहर आणि ग्रामीण भागातील संवेदनशील बस थांब्यांसाठी पोलीस प्रशासनाची मदत घेतली जाणार आहे. यासंबंधीचा पत्रव्यवहार एसटी प्रशासनाने पोलिस आयुक्तांना केला असल्याची माहिती आहे.
पुणे,पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील १४ आगारांतर्गत असणाऱ्या ४२ बस स्थानकांच्या हद्दीतील १०० बसथांबे संवेदनशील थांबे म्हणून निश्चित करण्यात आले आहेत.त्या ठिकाणी प्रतिबंधनात्मक उपायोजना करण्यासाठी पोलिस आयुक्तांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
चांदणी चौक, कात्रज, रावेत, चांदणी चौकातील बाह्यवळण ओलांडल्यानंतर महामार्गावरील हिंजवडी फाटयाजवळ मुंबईच्या दिशेने जाणारे आयटी कंपन्यातील प्रवासी कायम असतात.
हे प्रवासी रात्री अपरात्री महामार्गांलगत असणाऱ्या एसटी थांब्यावर बस थांबून प्रवास करत असतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी एसटी प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे.
पोलिसांची गस्तही या परिसरात वाढवणार असल्याची माहिती देण्यात आलीय.
काँग्रेसच्या वतीने भ्रष्टाचाराची करण्यात आली होळीकाँग्रेसच्या वतीने आज होळीच्या निमित्ताने भ्रष्टाचार तसेच महिला सुरक्षा संदर्भात त्याचबरोबर राज्यातील उद्योगधंदे पर राज्यात नेणाऱ्यांची तसेच महागाई तसेच बेरोजगार अशा बहुतांश मुद्द्यांवरून निषेधाची होळी करून या सर्व बाबींचा निषेध धुळ्यात करण्यात आला आहे,
यावेळी काँग्रेसच्या निषेध करता कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी या सर्व बाबींवरून सत्ताधाऱ्यांना होळीच्या माध्यमातून हेरण्याचा प्रयत्न करत नागरिकांचे या सर्व बाबींकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे,
निषेध होळी दरम्यान मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते या निषेध होळी दरम्यान एकवटल्याचे बघावयास मिळाले असून, यावेळी निषेध होळी दरम्यान सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देखील करून काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केला आहे.
Shirdi: साई मंदिरात पारंपरिक पद्धतीने होलिका दहनसाईबाबांच्या मंदिरात आज पारंपारीक पद्धतीने होळीचे दहन करण्यात आले..
साईमंदिर परीसरातील गुरूस्थान मंदिरासमोर होळी पेटवून मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक विधीवत पूजन केले..
साईबाबांच्या हयातीपासून शिर्डीत होलिका दहनाची ही परंपरा सुरू असून दरवर्षी मोठ्या उत्साहाने होळी दहनाचा कार्यक्रम अविरत सुरू आहे..
होळी सणानिमीत्त आज साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे तसेच साई मुर्तीला साखरेच्या गाठीकड्यांचा हार तसेच कोटयवधींचे सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले आहेत..
कोकणात जाणाऱ्या मार्गावर वाहतुक कोंडी० शिमग्यासाठी कोकणात जाणारे चाकमनी वाहतुक कोंडीत आडकले
० मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरून खोपोलीकडे जोडणाऱ्या मार्गावर वाहतुक कोंडी
० खोपोली नजीक शिळफाट्यावर वाहनांच्या रांगा
Beed Politics: बीड मधील आणखी एक मारहाणीचा व्हिडिओ समोर- ओमकार सातपुते तरुण एका मुलाला मारहाण करताना दिसत आहे.
- या व्हिडिओमध्येही अमानुष पद्धतीने मारहाण केली जात आहे.
- काल ओंकार सातपुते याला दादा खिंडकर यांनी मारहाण केलेला व्हिडिओ समोर आला होता.
- ओंकार सातपुते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुतेचां चुलत भाऊ आहे.
- आता ओंकार सातपुते याच्याकडून एका तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
- या व्हिडिओमुळे खळबळ उडाली असून कारवाई केली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल..
- संजय बावणे अमानुष मारहाण केली
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी नंदुरबारमध्ये महिलांची तुफान गर्दीपैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांची रांगच रांग....
होळी सणाच्या खरेदीसाठी अकाउंट वर आलेले पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर सकाळपासून महिलांची गर्दी.....
होळी सणा निमित्ताने योजनेचे पैसे मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण....
Beed Politics: शरण आलेल्या दादासाहेब खिंडकरला पिंपळनेर पोलिसांनी घेतले ताब्यातपिंपळनेर पोलीस ठाण्यात तरुणाला मारहाण केल्याच्या प्रकरणात दाखल झाला होता गुन्हा
बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात शरण आल्यानंतर पिंपळनेर पोलिसांची कारवाई
दादासाहेब खिंडकरला घेऊन पोलीस पिंपळनेर कडे रवाना
Nanded: जिल्ह्यात हळद काढणीला वेग, बाजरात हळदीची अवक वाढली दर मात्र स्थिरनांदेड जिल्ह्यात शेतकरी सध्या हळद काढणीमध्ये व्यस्त आहे.
एकाच वेळी अनेक तालुक्यात हळद काढणीचे काम सुरू आहे.
त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची अवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
हळदीची अवक वाढल्याने बाजारात सध्या हळदीला केवळ 10 हजार रूपये प्रति क्विंटल येवढाच भाव मिळत असल्याने हदळ उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.
Nanded: चोरीच्या 8 दुचाकी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केल्या जप्त, एक आरोपी पोलिसांच्या ताब्यातनांदेड जिल्ह्यात मागिल काही दिवसापासून दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाली होती.
त्याच पार्श्वभूमीवर ऑपरेशन फ्लश आऊटअंतर्गत पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरीच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत.
दरम्यान पोलिसांना गोपनीय मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी साफळा रचून शहरातील विष्णुपुरी भागातुन नवनाथ वडजे याच्याकडे चोरीच्या गुन्ह्यातील अनेक दुचाकी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.
या माहितीचा आधारे पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन आरोपीकडील सुमारे दोन लाख किंमतीच्या पाच दुचाकी पोलिसांनी जप्त केले आहेत.
रेल्वेगाड्यांवर पिशवी, फुगे न फेकण्याबाबत डोंबिवली रेल्वे पोलिसांचे आवाहनहोळी आणि धुलीवंदनादरम्यान लोकल आणि रेल्वे गाड्यांवर पाण्याच्या पिशव्या, फुगे फेकून मारल्यामुळे अनेक प्रवासी जखमी होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर असे प्रकार टाळण्यासाठी डोंबिवली रेल्वे पोलिसांनी पुढाकार घेतला असून रेल्वे रुळांलगत असणाऱ्या वस्तीमध्ये याबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.
दरवर्षी होळी आणि धुलीवंदनाच्या काळात पिशव्या आणि फुगे फेकून मारल्याने अनेक प्रवासी जखमी होत असतात.
तर या प्रकारामध्ये काही प्रवाशांना आपले डोळेही गमवावे लागल्याचे प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिसांनी आता पुढाकार घेत असे प्रकार टाळण्यासाठी उपाय योजना सुरू केल्या आहेत.
याचाच एक भाग म्हणून डोंबिवली रेल्वे रुळांलगत असलेल्या भागांमध्ये, वस्तीमध्ये रेल्वे पोलिसांचे पथक ठिकठिकाणी फिरून याबाबत जनजागृती करताना दिसत आहेत.
Pandharpur: पंढरपूरच्या गादेगावात प्लास्टिक मुक्त होळीपंढरपूर जवळच्या गादेगाव येथे आज प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत विद्यार्थ्यांनी प्लास्टिक वस्तू ची होळी केली.
गादेगाव येथील शिवरत्न पब्लिक स्कूलमध्ये प्लास्टिक आणि कचर्याची होळी करत पारंपारिक होळी सण साजरा केला.
यावेळी शाळेचे संस्थापक गणपत मोरे यांनी प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम त्याचबरोबर पर्यावरणाची होणारी हानी याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
गेल्या पाच वर्षांपासून येथील विद्यार्थी प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत होळी साजरी करतात.
राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांची मानाची होळी आसली गावाला संपन्नसातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये होळीचा उत्साह पाहण्यास मिळत आहे ज्या मानाच्या होळी उत्सव दिवसा साजरा केला जात असतो.
राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री के.सी .पाडवी यांची मानाची होळी आसली गावाला मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आली.
होळी साठी आदिवसी संस्कृती मधील आसलेल्या सर्व नियमांचे पालन या ठिकाणी करून होळी उत्सव साजरा करण्यात आला.
Pimpri-Chinchwad: पिंपरी- चिंचवड शहरातील मोशी परिसरात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोडमोशीत दोन गटाच्या वादात तीन दुचाकींची आणि एक चारचाकी वाहनांची 10 ते 15 जणांनी तोडफोड केली आहे.
वाहन तोडफोडीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये देखील कैद झाली आहे..
बुलेटच्या सायलेन्सर मधून फटाके का वाजवतो, यावरुन वादाला तोंड फुटले अन पुढं या वादातून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.
काल रात्री उशिरा मोशीतील सस्ते वस्ती तालीम येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे
संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ जावयाची गाढवावरून काढली जाणारी मिरवणूक रद्दकेज तालुक्यातील विडा येथे दरवर्षी जावयाची धुलिवंदनानिमित्त गाढवावरून मोठ्या उत्साहात धुलीवंदनाचा जावई ही मिरवणूक काढली जाते.
मात्र यावर्षी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ ही मिरवणूक काढली जाणार नाही.
याबाबत गावकऱ्यांनी एकत्र येऊन एकमताने हा निर्णय घेतला आहे.
Melghat: आदिवासींमध्ये होळीचा उत्साह, आदिवासी वेशभूशेत नृत्य, मेळघाटात 5 दिवस चालतो होळीचा सणमेळघाटातील आदिवासीच्या जीवनातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणजे होळी असतो..
होळीच्या सणाला आदिवासी बांधव मेळघाटात एकत्र जमतात..
मेळघाटात होळी असून पाच दिवस साजरा केला जातो..
आज होळीच्या दिवशी सकाळपासूनच आदिवासी बांधव आपल्या वेशभूषेत नृत्य करताना दिसले..
आपल्या आदिवासी वेशभूषेत बासरीच्या तालावर आदिवासी बांधव नृत्य करत आहेत.. सायंकाळी होलिका दहन मेळघाटात होते..
आदिवासी बांधवांमध्ये या होळी दरम्यान फगवा देखील मागितला जातो..
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निलंबीत करण्याचे पाणी पुरवठा मंत्र्यांनी दिले आदेशजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारि यांना बैठक् घेऊन जिल्ह्यातील अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना..
जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणाऱ्या 1357 पाणी पुरवठा योजना पैकी फक्त 296 योजनापूर्ण पैकी 118 योजनेचे कामे अद्यापही बंद आहेत..
कामे ना करणाऱ्या ठेकेदारावर कडक कारवाई करण्याचे दिले आदेश तसेच जबाबदार अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्याचे पाणी पुरवठा मंत्र्यांचे आदेश..
645 योजनेच्या कामा पैकी जी अपूर्ण कामे ठेवल्या गेलंय अश्या कंत्रातदारावर दांडात्मक कारवाई करण्याचे दिले आदेश..
शिवाय दांडात्मक कारवईस प्रतिसात न देणार्या तसेच दीर्घकाळ कामे प्रलंबीत ठेवणाऱ्या कंत्रातदाराना काळ्या यादीत टाकण्याचे दिले निर्देश...
जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेबाबत चार बैठका घेऊनही कामे अपूर्णच, त्यामुळे मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी...
तिवसा नगरपंचायतचे नगराध्यक्ष योगेश वानखडे यांचा नगराध्यक्षपदाचा राजीनामातिवसा नगरपंचायतचे काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष योगेश वानखडे यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे अमरावती जिल्हाधिकारी यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवील,योगेश वानखडे यांनी 14 फेब्रुवारी 2022 रोजी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार हाती घेतला होता. मात्र तीन वर्षानंतर त्यांनी अचानक राजीनामा दिला आहे,तिवसा नगरपंचायत मध्ये काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता असून त्यांनी अचानक राजीनामा का दिला हे स्पष्ट केलं नाही तर योगेश वानखडे यांच्या नंतर नगराध्यक्षाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष लागलं आहे
धाराशिव जिल्ह्यातील १२ पैकी ९ साखर कारखान्याची धुराडी बंद, १९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादनधाराशिव जिल्ह्यात यावर्षीचा साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपत आला असुन जिल्ह्यातील बारा पैकी नऊ साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत तर उर्वरित ३ साखर कारखाने लवकरच बंद होण्याची शक्यता आहे.धाराशिव जिल्ह्यातील ५ सहकारी व ७ खाजगी साखर कारखान्यांनी यंदा १९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.चालु गळीत हंगामाच्या अहवालानुसार धाराशिव जिल्ह्यात २८ लाख १७ हजार ३६५ टन ऊसाचे गाळप झाले आहे त्यापासून १९ लाख १६ हजार ९७६ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे जिल्ह्याचा साखरेचा सरासरी उतारा केवळ ६.८ टक्के आहे.
Pune: होळीसाठी झाडे तोडल्यास १ लाख रुपयांचा दंडपुणे पालिकेकडून करण्यात येणार दंडात्मक कारवाई
पुणे शहरातील वन विभागाच्या हद्दीत असलेली तसेच नदीकाठ आणि आसपासच्या परिसरातील झाडे तोडीवर प्रशासनाची असणार करडी नजर
शुक्रवारी होणाऱ्या होळी निमित्त अनेक ठिकाणी लाकडांचा वापर केला जातो
महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम २०२१ या कायद्यानुसार विनापरवाना झाडे जाळणे, झाडे तोडणे हा दंडात्मक गुन्हा
याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिका सुद्धा झाडे तोडणाऱ्या व्यक्तींकडून वसूल करणार १ लाख रुपयांचा दंड
जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी निषेध आंदोलनजुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी तसेच वेतनश्रेणीमध्ये वाढ करण्यात यावी यासह अन्य मागण्या घेऊन बुलढाणा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले.. लवकरात लवकर मागण्या मान्य करण्यात याव्या अन्यथा यापेक्षा तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे..
बहुप्रतिक्षित अमरावती विमानतळावरून 31 मार्चपासून विमान सेवा होणार सुरूपश्चिम विदर्भातील अमरावती शहर हे महत्त्वाचं विभागीय मुख्यालय आहे मात्र या मुख्यालयातुन विमान सेवा सुरू नव्हती,
अमरावतीच्या विमानतळावरून विमान सेवा सुरू करावी अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची अमरावती व आसपासच्या अकोला यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांची मागणी होती.
सप्टेंबर 2023 रोजी इंदू कन्स्ट्रक्शन कंपनीने विमानतळाच्या कामाला सुरुवात केली व ऑक्टोबर 2024 रोजी विमानतळाचे काम पूर्ण झाले,
अखेर 31 मार्च रोजी या विमानतळावरून विमा सेवा सुरू करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे.
विमानतळावर सर्व सोयी सुविधा तयार करण्यात आल्या असून सुरक्षा यंत्रणा देखील तैनात करण्यात आलेली आहे.