Maharashtra Politics News live : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राज्याच्या अर्थसंकल्पाची व शक्तिपीठ अधिसूचनेची होळी
Sarkarnama March 13, 2025 09:45 PM
Swabhimani Shetkari Sanghatana : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राज्याच्या अर्थसंकल्पाची व शक्तिपीठ अधिसूचनेची होळी

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती तात्काळ करावी तसेच शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या प्रमुख मागण्यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राज्याच्या अर्थसंकल्पनाच्या प्रतीची होळी करून होळीच्या भोवती सरकारच्या विरोधात बोंबा मारत सरकारचा निषेध करण्यात आला.

Radhakrishna Vikhe Patil : संगमनेरमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर धक्काबुक्की

राधाकृष्ण विखे पाटील हे संगमनेरच्या दौऱ्यावर होते. संगमनेर नगरपालिकेत विखे पाटील यांनी आढावा बैठक घेतली हेाती. त्या बैठकीत छात्रभारती संघटनेचे कार्यकर्ते पालकमंत्री विखे पाटील यांना निवेदन देण्यासाठी आले होते. त्या वेळी छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी मंत्री नीतेश राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. राणे यांचा राजीनामा घेण्याची मागणी त्यांनी केली होती, घोषणाबाजीनंतर गोंधळ वाढत गेला. त्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. हा प्रकार विखे पाटील यांच्यासमोर घडला

Dhananjay Munde : ....तर सरकार संशयाच्या भोवऱ्यात येणार

धनंजय मुंडे 302 च्या गुन्ह्यात शंभर टक्के येणार आहे, ही गोष्ट सर्वांना आता कळते आहे. पुरवण्या दोषारोपापत्रात ते सहआरोपी म्हणून येणार. ते जर आले नाही तर सरकार संशयाच्या भोवऱ्यात येणार, असे विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले.

Krushna Andhale : तो कृष्णा आंधळे नाहीच, नाशिक पोलिसांचे स्पष्टीकरण

काही दिवसांपूर्वी कृष्णा आंधळे हा नाशिकमधील गंगापूर येथे फिरत असल्याचे माहिती काही नागरिकारांनी दिली होती. त्यावर नाशिक पोलिसांनी चौकशी करून स्पष्टीकरण दिलं आहे. तो कृष्णा आंधळे नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून नावांवर चर्चा

विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झीशान सिद्दिकी यांचं नाव आघाडीवर असल्याचे समजते. पक्षातील काही नेत्यांनी सिद्दिकी यांच्या नावाला विरोध केल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभेत पराभूत झालेल्या उमेदवाराला पुन्हा संधी नको अशी भूमिका काही नेत्यांनी घेतली आहे.

सांडू दादा खिंडकर पोलिसांच्या ताब्यात

धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर हे पोलिसांना शरण आले आहेत. खिंडकर हे एका व्यक्तीला मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ बुधवारी व्हायरल झाला होता, त्यांनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. पिंपळनेर पोलिसांनी ही कारवाई केली आहे,

Pune Metro: पुणे मेट्रो उद्या बंद राहणार

राज्यात आज होळी साजरी होत आहे. यानिमित्ताने पुणे मेट्रोकडून विशेष आवाहन करण्यात आले आहे. पुणे मेट्रोकडून विशेष आवाहन करण्यात आले आहे. उद्या १४ मार्च रोजी सकाळी ६.०० ते दुपारी ३.०० या वेळेत पुण्यात मेट्रो सेवा बंद राहणार आहे. दुपारी ३:०० ते रात्री ११:०० या वेळेत पुणे मेट्रोची प्रवासी सेवा नियमित सुरु असेल. याबाबत पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी टि्वट करीत माहिती दिली आहे.

Pune Crime : पुण्यात टोळक्याकडून हॉटेल मालकाला बेदम मारहाण

पुण्यातील खराडी भागात असणाऱ्या एका हॉटेलमध्ये घुसून टोळक्याने हॉटेलची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. शिवाय या टोळक्याने हॉटेल मालकाला देखील बेदम मारहाण केली आहे. बुधवारी रात्रीच्या 10 च्या सुमारास ही घटना घडली आहे.

Satish Bhosale Arrest Live : सतीश भोसलेचा ताबा बीड पोलिसांनी घेतला

बीडवरून प्रयागराज गेलेल्या पोलिस पथकाने खोक्या उर्फ सतीश भोसलेचा ताबा घेतला आहे. प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलिस ठाण्यातून हा ताबा घेण्यात आला आहे. ताबा घेतल्यानंतर आज अकरा वाजता प्रयागराज न्यायालयासमोर खोक्याला हजर केलं जाणार आहे. तर त्यानंतर त्याला बीडमध्ये आणण्यात येण्याची शक्यता आहे.

Satish Wagh Murder Case : योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येसाठी जादूटोण्याचा प्रयोग

आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश तात्याबा वाघ यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार अक्षय जावळकर असून त्याला हे कृत्य करण्यास मोहिनी वाघनेच प्रवृत्त केल्याचं पोलिसांच्या तपासात उघडकीस आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे सतीश यांचा काटा काढण्यासाठी जादूटोण्याचा प्रयोग केल्याची माहिती आरोपपत्रातून समोर आली आहे. लष्कर न्यायालयात नुकतेच एक हजार पानांचे दोषारोपपत्र गुन्हे शाखेकडून दाखल करण्यात आले आहे. यामधून ही माहिती उघडकीस आली आहे. सतीश वाघ यांचा 9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास अपहरण करून पंधरा मिनिटांतच तब्बल 72 वार करून खून करण्यात आला होता. त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून देण्यात आला होता.

Satish Bhosale Arrest : खोक्याची तडीपारी निश्चित...

भाजप आमदार सुरेश धसांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. त्याला प्रयागराजमधून अटक केली आहे. खोक्याने केलेल्या मारहाणीचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला प्रयागराज येथून अटक केली आहे. तर आज त्याला प्रयागराज कोर्टात हजर करणार आहेत. तर बीड कोर्टापुढे हजर होण्याआधी त्याची तडीपारी निश्चित मानली जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.