रायगड -
० मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
० माणगाव आणि इंदापूरमध्ये कोकणात जाणाऱ्या मार्गावर वाहनांची संख्या वाढली
० सहा ते सात किलोमीटर लांबीच्या रांगा
० शिमगाउत्सवासाठी कोकणात निघालेले चाकरमानी वाहतूक कोंडीत आडकले
Baramati News: बारामतीमध्ये एआय आधारीत शेती कार्यक्रमाला सुरूवातबारामती -
- एआय आधारीत शेती कार्यक्रमाला सुरूवात
- बारामतीमध्ये होत आहे कार्यक्रम. साखर कारखान्यांचे अध्यक्ष, शेतकरी , तंत्रज्ञ कार्यक्रमाला उपस्थित
- शरद पवार, प्रतापराव पवार, हर्षवर्धन, सुप्रिया, राजेश टोपे यांच्यासह रेवती सुळे आणि युगेंद्र पवार ही उपस्थित
Pune News: पुण्यात गुंडांची दहशत कायम, एकाला बेदम मारहाणपुणे -
- पुण्यातील खांदवेनगर परिसरात गुंडाच्या टोळक्याकडून एकाला बेदम माराहाण.
- खांदवे नगर परिसरात गुंडगिरी.
- आकाश वायकर आणि त्यांच्या टोळीकडून मारहाण.
- मारहाणीचा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल.
Kolhapur News: स्वाभिमानीचे कार्यकर्ते गनिमी काव्याने आंदोलन यशस्वी करतील - राजू शेट्टीस्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारल्यानंतर मला पोलिसांनी नजर कैदेत ठेवलं
मात्र स्वाभिमानीचे कार्यकर्ते गनिमी काव्याने आंदोलन यशस्वी करतील
रत्नागिरी नागपूर महामार्गाला जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध नाही मात्र योग्य मोबदला दिला पाहिजे
सरकार दडपशाही करत आहे मात्र आमचा लढा सुरूच राहणार
राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया
Sangli News: सांगली- कोल्हापूर मार्गावर रस्तारोको आंदोलनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दाखलसांगली -
कोल्हापूरच्या उदगाव या ठिकाणी सांगली- कोल्हापूर मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दाखल.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून रस्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न -
पोलिसांच्या कडून आंदोलकांना घेण्यात आले ताब्यात,
महिला देखील रस्त्यावर ठाण मांडून,
सांगली कोल्हापूर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न..
Nashik News: नितेश राणे यांच्या भूमिकेला नाशिकच्या खाटीक समाजाचा विरोधनाशिक -
- भाजप नेते नितेश राणे यांच्या भूमिकेला नाशिकच्या खाटीक समाजाचा विरोध
- हलाल पद्धतीनेच मटण विक्री करण्याचा खाटीक समाजाचा निर्णय
- हलालच्या मुद्यावर वादळ उठलेले असताना खाटीक समाजाच्या बैठकीत झाला निर्णय
- व्यवसायात जाती धर्माचा संबंध नाही, ते कोण आम्हाला प्रमाणपत्र देणारे?
- नाशिकमधे झटका नाही तर हलाल पद्धतीनेच होणार मटण विक्री
Pune News: तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजंतीच्या निमित्ताने किल्ले शिवनेरीवर दीपोत्सवपुणे -
- तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजंतीच्या निमित्ताने किल्ले शिवनेरीवर दीपोत्सव
- फाल्गुनी पौर्णिमेला शुक्रवारी (ता.14 मार्च) करण्यात आला दीपोत्सव
- सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या वतीने शिवनेरी वरील शिवजन्मस्थाना जवळ आयोजित दिपोत्सवात शिवजन्मस्थळ उजळुन निघाले
Baramati News: शरद पवार गोविंद बागेतील निवासस्थानी,भेटीसाठी कार्यकर्त्यांची गर्दीबारामती -
- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गोविंद बागेतील निवासस्थानी
- शरद पवार यांच्या भेटीसाठी नागरिकांची गर्दी
- ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट च्या कार्यक्रमाला शरद पवार राहणार उपस्थित
- एआय वर आधारीत ऊस उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांशी शरद पवार साधणार संवाद
- ट्रस्टचे संचालक प्रतापराव पवार देतील असणार उपस्थित
- एआय शेतीची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रतापराव पवार यांचे विशेष प्रयत्न
Buldhana News: बुलडाण्यात दोन गटातील वाद, २५ जणांविरोधात गुन्हाबुलडाणा -
खामगाव तालुक्यातील आवार गावात दोन गटात काल झालेल्या दंगली प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील २५ जणांवर केला विविध कलमान्वये गुन्हा दाखल.
खामगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल.
काल रंगपंचमी साजरी करण्यादरम्यान डी जे वर गाणे वाजविण्यावरून झाला होता मोठा राडा.
सध्या या गावात राज्य राखीव पोलीस , दंगा काबू पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त.
पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी रात्री उशिरा पुन्हा घेतला गावातील परिस्थितीचा आढावा.
गावातील परिस्थिती नियंत्रणात असून आरोपींची धरपकड अद्याप सुरू असल्याची पोलिस अधीक्षकांची माहिती.
Sambhajinagar: संभाजीनगरमध्ये दुचाकी जाळल्या, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणछत्रपती संभाजीनगरच्या सिडको वाळुज महानगरातील साईनगर वसाहतीत मध्यरात्रीस नाईट गाऊन घालून आलेल्या अज्ञात माथेफिरूने दोन दुचाकी जाळल्याची घटना घडली.
त्यामुळे रहिवासी नागरिकात मोठे भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे.
सिडको वाळूज महानगरातील साईनगर वसाहतीत राहणारे संजय बाबुराव मारजवाडे हे त्यांच्या कुटुंबासमवेत मध्यरात्रीला गाढ झोपेत असताना रात्री दोन ते अडीचच्या दरम्यान ही घटना घडली.
अज्ञात माथेफिरूने घरासमोर उभ्या असलेला मोटरसायकलला आग लावून पेटवून दिले असता आगीच्या झोताने घराच्या बाहेर असलेले इलेक्ट्रिक मिटर मोटर सायकल जळून खाक झाल्या.
Nashik News: नाशिकमध्ये रिक्षा चालकांची गुंडगिरी, कुटुंबाला बेदम मारहाणनाशिक -
- नाशिकमध्ये रिक्षा चालकांची गुंडगिरी
- अनधिकृत रिक्षाचालकांकडून सर्वसामान्यांवर सर्रास दादागिरी
- शालिमार चौकात रिक्षा चालकांची झुंडशाही मोबाईल कॅमेरात कैद
- गाडीचा कट लागण्याचा राग, परिवारासह चाललेल्या व्यक्तीला मारहाण
- गाडीतील महिला हात जोडून माफी मागत असताना देखील रिक्षाचालकांची मुजोरी
- नाशिकमध्ये अनधिकृत रिक्षाचालकांचा हैदोस
- पोलीस प्रशासन मात्र गप्प..
- सर्वसामान्यांवर रिक्षा चालकांची सर्रास दादागिरी आणि झुंडशाही..
- शहरातील अनधिकृत रिक्षा चालक तात्काळ हटवण्याची नागरिकांची मागणी
Chandrapur News: चंद्रपूरमध्ये भीषण अपघात, उभ्या ट्रकला बसची धडक; एकाचा जागीच मृत्यूउभ्या ट्रकला बसची धडक, एकाचा जागीच मृत्यू
नागपूरकडून चंद्रपूरकडे भरधाव वेगाने येत असलेल्या महामंडळाच्या बसने उभ्या ट्रकला दिलेल्या धडकेत एक ठार तर आठ प्रवासी जखमी झाले.
हा अपघात रात्री एक वाजताच्या सुमारास घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व जखमी प्रवाशांना रुग्णालयात हलवण्यात आले.
मात्र या बसचा वाहक संदीप वनकर मृत पावला. चंद्रपूर शहरालगत असलेल्या पडोली येथील मुख्य चौक सध्या अपघाताचे केंद्र ठरले आहे.
येथील वाहतूकदार रस्त्याच्या कडेला ट्रक उभे करतात, ज्यामुळे महामार्गाची वाहतूक प्रभावित होते.
रात्रीच्या सुमारास कडेला असलेले हे ट्रक दिसतही नाही. त्यामुळे इथे रोज छोटे मोठे अपघात होत आहेत.
Kolhapur News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यातकोल्हापूर -
रत्नागिरी - नागपूर महामार्गावर आज होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची धरपकड सुरू
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात
पोलिसांकडून दबाव टाकून कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन घेण्यास सुरुवात