Air Strike : राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांची पहिली मिलिट्री Action, या देशावर थेट एअर स्ट्राइक
GH News March 16, 2025 10:06 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दुसरा कार्यकाळ आहे. दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्या लष्करी कारवाईचा आदेश दिला. त्या आदेशावर अमेरिकन सैन्य दलाने तात्काळ अमलबजावणी केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकन एअर फोर्सने येमेनमधील हुती दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ले केले. लाल सागरात जहाजांवर हल्ले झाल्यानंतर ‘नरकाचा पाऊस पडेल’ असा डोनाल्ड ट्रम्प यांनी हुती दहशतवाद्यांना इशारा दिला होता. अमेरिकेच्या या हवाई हल्ल्यात कमीत कमी 19 लोक मारले गेले आहेत. अनेक जण जखमी आहेत.

लाल सागरात इस्रायलशी संबंधित जहाजांवर हल्ले करण्याची हुती दहशतवाद्यांनी धमकी दिली होती. गाझा पट्टीत इस्रायलने मानवी मदत रोखून धरली आहे, त्या विरोधात हुतीकडून इस्रायलला ही धमकी देण्यात आली होती. इस्र्यालने मागच्या तीन आठवड्यांपासून गाझा पट्टीत कुठलीही मानवी मदत देण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे जवळपास 20 लाख लोक उपासमारीच्या सावटाखाली आहेत. हुती दहशतवाद्यांनी धमकी दिलेली की, बंदी आदेश मागे घेतला नाही, तर लाल सागरात इस्रायलशी संबंधित जहाजांवर पुन्हा हल्ले करु. त्यानंतर ट्रम्प यांनी येमेनमध्ये एअर स्ट्राइक करण्याचे आदेश दिले.

शेवटचा हल्ला कधी झालेला?

येमेनधील हुती दहशतवाद्यांनी लाल सागरात शेवटचा हल्ला डिसेंबर महिन्यात केला होता. गाझामध्ये युद्ध विराम लागू झाल्यानंतर हुतींनी आपले हल्ले थांबवले होते. हुती हल्ले रोखण्यासाठी हा आदेश दिला असं अमेरिकी राष्ट्राध्यक्षांकडून सांगण्यात आलं. हे एक दीर्घकाळ चालणारं अभियान असू शकतं, असे संकेत व्हाइट हाऊस प्रशासनाने दिले आहेत.

अमेरिकेच्या जहाजांवर कितीवेळा हल्ला?

व्हाइट हाऊसने प्रेस रिलीजमध्ये माहिती दिलीय की, “हल्ले सुरु होण्याआधी वर्षाला 25 हजार जहाजं लाल सागरातून जायची. पण आता ही संख्या 10 हजारवर आली आहे” प्रेस रिलीजनुसार, 2023 पासून आतापर्यंत अमेरिकेच्या व्यापारी जहाजांवर 145 वेळा हल्ला झाले आहे. ट्रम्प यांच्या शपथविधीआधी शेवटचा हल्ला डिसेंबर महिन्यात झाला होता.

मर्यादीत स्वरुपाची सैन्य कारवाई का?

गाझा पट्टीत युद्ध विराम लागू झाल्यानंतरही इस्रायलकडून हल्ले सुरुच आहेत. अलीकडे बेत लाहियामध्ये झालेल्या हल्ल्यात बचावकर्मी, पत्रकारांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. हे हल्ले म्हणजे सीजफायरच उल्लंघन असल्याचा हमासचा दावा आहे. हमासवर बंधकांच्या सुटकेचा दबाव टाकण्यासाठी इस्रायल गाझा पट्टीत मर्यादीत स्वरुपाची सैन्य कारवाई करु शकतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.