Minister Gulabrao Patil Claims Jayant Patil Will Join Shiv Sena : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी भाजपसह अजित पवार गटही पायघड्या घालून तयार आहे. त्यामध्ये आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने उडी घेतली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी जयंत पाटील आमच्याकडे येतील, असा दावा केला आहे. गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानंतर जंयत पाटील शरद पवारांची साथ सोडणार असल्याच्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील यांनी जयंत पाटील शिवसेनेत येतील असे वक्तव्य केले. त्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले. जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार आहेत का? याबाबत राजकीय चर्चेला जोर आला. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. विधानसभा अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील यांना साद घातली होती. आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेते गुलाबराव पाटील यांनी जयंत पाटील आमच्याकडे येतील असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे.
मंत्री गुलबाराव पाटील काय म्हणाले ? Jayant Patil to Join Shinde Sena?जयंत पाटील हे आमच्याकडे येतील. मी नाराज नाही मला बाहेर बोलण्याची चोरी आहे, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं होतं यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे..
लोकसभा निवडणुकीनंतर जयंत पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा रंगलीय. मात्र त्याची कारणं काय आहेत?
जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार का?
- राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्षपदावरुन असलेला सुप्त संघर्ष
- साखर कारखान्याला आवश्यक असलेली आर्थिक मदत
- विधानसभा निवडणुकीत घसरलेलं मताधिक्य
- मतदारसंघातील कामं मार्गी लावण्यासाठी सत्तेला प्राधान्य
- मंत्रिमंडळातील खुणावत असलेलं 1 रिक्त मंत्रिपद