Sunday Special Breakfast Recipe: रविवारी नाश्त्यात बनवा स्वादिष्ट अन् चटपटीत 'स्टफ आलू टिक्की' , लगेच नोट करा रेसिपी
esakal March 16, 2025 02:45 PM

Stuffed Aloo Tikki Chaat Recipe: सकाळी नाश्ता करणे गरजेचे असते. यामुळे दिवसभर थकवा जाणवत नाही. पण रविवारी सर्वांना सुट्टी असल्याने काही खास आणि चटपटीत बनवायचे असेल तर नाशत्यात 'स्टफ आलू टिक्की' बनवू शकता. यामुळे घरातील सदस्य देखील तुमचे कौतुक करतील. 'स्टफ आलू टिक्की' बनवणे सोपे असून चवदार देखील आहे. 'स्टफ आलू टिक्की' बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.

'स्टफ आलू टिक्की' बनवण्यासाठी लागणारे साहित्य

चणा डाळ

बटाट

दही

आलं-लसून पेस्ट

कॉर्न फ्लॉवर

मीठ

तेल

'स्टफ आलू टिक्की' बनवण्याची कृती

'स्टफ आलू टिक्की' बनवण्यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये तेल, जिर, आलं -लसून पेस्ट वाफवलेली चणा डाळ, मीठ लाल तिखट, हळद मिसळा. तसेच चमच्याच्या मदतीने चांगले बारिक करा. नंतर एका बाउलमध्ये वाफवलेला बटाटा, बारिक चिरलेली कोथिंबीर, कॉर्नफ्लॉवर, तेल चांगले मिसळा. नंतर हातावर छोटा गोळा करा आणि त्यात चणा डाळीचे मिश्रण टाका आणि पॅक करा. नंतर पॅन गरम करून थोडे तेल टाका आणि डिप फ्राय करा. वरून दही, चिंच चटणी घालून स्टफ आलू टिक्कीचा आस्वाद घेऊ शकता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.