Aurangzeb Tomb News : '...तरच कबरला हात न लावणे योग्य ठरेल' - आमदार रोहित पवार
Sarkarnama March 16, 2025 02:45 PM
Karnataka KTPP Act : सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण; भाजपचा हल्लाबोल

कर्नाटक सरकारने सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिलीय. त्यामुळे आता या निर्णयावरून भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. तर कर्नाटक सरकारचा हा निर्णय देशासाठी घातक असल्याचा दावा केला आहे. तसेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निर्णयाला विरोध करताना भाजपने हा निर्णय बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्याविरुद्ध असल्याचेही म्हटलं आहे.

Beed Crime News : पोलिसांकडून खोक्या भाईची चौकशी, 7 दिवसांची पोलीस कोठडी

भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्या भाईला 7 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आलीय. यानंतर पोलीसांनी थेट त्याला थेट शिरूर कासार येथील बावी गावी दाखवले. जेथे त्याने माळरानावर ढाकणे पितापुत्रांना मारहाण केली होती. तसेच येथेच त्याची चौकशी करण्यात आली. तसेच घडलेल्या घटनेचा घटनाक्रम जाणून घेतला. सतीश भोसलेवर ढाकणे पितापुत्रांच्या मारहाणीसह, हरिणांच्या शिकारीचा गुन्हा दाखल आहे.

Aurangzeb Tomb News : 'तरच कबरला हात न लावणे योग्य ठरेल' - आमदार रोहित पवार

औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. अनेकांनी ही कबर उखडून टाकण्याची मागणी केली. आता यावर राष्ट्रवादी पक्ष SP चे आमदार रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. '27 वर्ष औरंगजेबाला येथे राहून राज्य करता आलं नाही ज्याच प्रतीक औरंगजेबाची कबर आहे. ही कबर आज काढून टाकली तर भविष्यात लोक गडबड करतील त्यामुळे एक प्रतीक म्हणून त्या कबरीला हात न लावणेच योग्य ठरेल' त्यांनी म्हटलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.