Stock Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार तेजीत; सेन्सेक्स 400हून अधिक अंकांनी वाढला
esakal March 17, 2025 03:45 PM

Stock Market Opening Today: आज शेअर बाजारात फ्लॅट सुरुवात झाली. त्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीने वेग घेतला. सेन्सेक्स 2 अंकांनी वाढून 73,830वर उघडला. निफ्टी 44 अंकांनी घसरून 22,353 वर उघडला. बँक निफ्टी 159 अंकांनी वाढून 48,219 वर उघडला. मात्र, बाजार उघडल्यानंतर काही वेळातच सेन्सेक्स 400 हून अधिक अंकांनी वाढला. निफ्टीनेही 130 अंकांच्या वाढीसह व्यवहाराला सुरुवात केली.

आजच्या व्यवहारात निफ्टीवरील बँक, ऑटो, एफएमसीजी, मेटल आणि फार्मा निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. तर आयटी आणि रिअल्टी निर्देशांक लाल रंगात दिसत आहेत.

आज सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 21 शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. आजच्या टॉप गेनर्समध्ये INDUSINDBK, BAJAJFINSV, TATAMOTORS, LT, ADANIPORTS यांचा समावेश आहे. सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये ZOMATO, HCLTECH, NESTLEIND, KOTAKBANK यांचा समावेश आहे.

Nifty Today Auto, Pharma, Metal Top Gainers जागतिक संकेत कसे आहेत?

आज देशांतर्गत जागतिक संकेत अधिक चांगले दिसत आहेत. आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये खरेदी दिसून येत आहे. याआधी शुक्रवारी अमेरिकन बाजार तेजीसह बंद झाले होते. मात्र, अमेरिकन फ्युचर्समध्ये घसरण दिसून आली आहे.

शुक्रवारी डाऊ जोन्स इंडस्ट्रियल 675 अंकांनी वाढून 41,488.19च्या पातळीवर बंद झाला. NASDAQ Composite 451 अंकांनी वाढून 17,754.09 च्या पातळीवर बंद झाला. तर S&P 500 निर्देशांक सुमारे 117 अंकांनी वाढून 5,638.94 च्या पातळीवर बंद झाला.

BSE SENSEX

या आठवड्यात यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हची बैठक होणार आहे. बाजाराला अशी अपेक्षा आहे की व्याजदरात कोणताही बदल होणार नाही, परंतु आर्थिक अनिश्चिततेच्या दरम्यान, गुंतवणूकदार फेडच्या निर्णयाबाबत सावध आहेत.

आशियाई बाजारात खरेदी

आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये खरेदी दिसून येत आहे. आशियाबद्दल बोलायचे झाले तर GIFT NIFTY 0.72 टक्क्यांनी तर Nikkei 225 मध्ये 1.13 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. स्ट्रेट्स टाइम्स 0.82 टक्क्यांनी वधारला आहे तर हँग सेंग सुमारे 1.51 टक्क्यांनी वाढला आहे. तैवान वेटेडमध्ये 1.30 टक्के आणि कोस्पीमध्ये 1.38 टक्के वाढ दिसून आली आहे. तर शांघाय कंपोझिट 0.38 टक्क्यांनी वाढताना दिसत आहे.

NSE वर उपलब्ध आकडेवारीनुसार, 13 मार्च 2025 रोजी, परदेशी पोर्टफोलिओ म्हणजे FII हे निव्वळ विक्रेते होते आणि त्यांनी 792.90 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. त्याच वेळी, या कालावधीत देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार देखील निव्वळ खरेदीदार होते आणि त्यांनी 13 मार्च 2025 रोजी 1,723.82 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.