Aamir Khan Gauri : बॉलिवूड अभिनेता आमिर खान सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. आमिर वयाच्या ६० व्या वर्षी प्रेमात पडला आहे. वाढदिवसाच्या आधी त्याने आमिरने त्याच्या नव्या गर्लफ्रेंडबाबत खुलासा केला. त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव गौरी स्प्रॅट असे आहे. सध्या आमिर आणि गौरी यांच्या नात्याची सर्वत्र चर्चा होत आहे. अशातच आमिरने केलेल्या एका विधानाने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, आमिरने जेव्हा माध्यमांसोबत गौरीबाबतचा खुलासा केला तेव्हा त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्याच दरम्यान 'बॉलिवूड सुपरस्टार्सपैकी शाहरुख खानला १९९१ मध्ये त्याची गौरी भेटली, १८ महिन्यांपूर्वी त्याची गौरी भेटली, आता सलमान खानला..? असे एकाने म्हटले.
त्यावर आमिर खान म्हणाला, 'आता सुद्धा त्याची गौरी शोधायला हवी असचं ना..' त्यानंतर गमतीने 'गौरी शोधायला हवी पण.. सलमान आता काय शोधणार..' असे आमिरने म्हटले. सलमान खानला सेटल होण्यासाठी काय टिप्स द्याल? असा प्रश्न पापराझींनी आमिरला विचारला. त्यावर उत्तर देताना आमिरने 'सलमान तेच करणार जे त्याच्यासाठी योग्य आहे' असे उत्तर दिले.
कोण आहे आमिर खानची गर्लफ्रेंड?
आमिर खानच्या नव्या गर्लफ्रेंडचे नाव असे आहे. ती बंगळुरूमध्ये राहते. आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये गौरी काम करते. ते दोघे एकमेकांना २५ वर्षांपासून ओळखतात. १८ महिन्यांपूर्वी त्याच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली. गौरीचा घटस्फोट झाला असून तिला एक मुलगा देखील आहे.