'' या मालिकेतील सोनू उर्फ झील मेहता सध्या चर्चेत आहे. झीलने पुन्हा एकदा लग्न केल्याचं समोर आलं आहे. झीलने स्वत: याबाबतची माहिती सर्वांना दिली आहे. डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकलेल्या झीलने आता पुन्हा लग्न केल्यामुळे सोशल मीडियावर देखील लक्ष वेधते आहे.
अभिनेत्री झील मेहता सर्वांच्या परिचयाची आहे. झीलने तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतून लोकप्रियता मिळवली आहे. सध्या अभिनेत्री या मालिकेत नसली तरी तीची क्रेझ चाहत्यांमध्ये आहे. सोशल मीडियावर झील मेहता तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.
नुकतंच झीलने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता पारंपारिक अंदाजामध्ये झील आणि तिचा नवरा दिसत आहे. दोघांनीही याआधी २८ डिसेंबर २०२४ मध्ये लग्नगाठ बांधली. मोठ्या थाटामाटात या दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला. सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नसोहळ्याचे फोटो व्हायरल झाले होते. झीलने बॉयफ्रेड आदित्य दुबेबरोबर लग्न केले आहे. मात्र आता पुन्हा या दोघांनी लग्न केल्याने ही जोडी सध्या चर्चेत आहे.
नुकत्याच शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये झील आणि आदित्य दोघांनीही रजिस्टर मॅरेज केल्याचं दिसत आहे. दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात हार घातलेला आहे. आनंदात दोघेही खूपच सुंदर दिसत आहे.सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत झीलने 'Finally Legally Married 17-02-25' असा कॅप्शन दिलं आहे. सोशल मीडियावर झीलच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.