प्रसिद्ध संगीतकार ए.आर.रहमान यांची काल प्रकृती खालावली. चेन्नईमधील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. ए.आर.रहमान यांच्या छातीत अचानक दुखू लागले होते. त्यांना डिहायड्रेशनचा त्रास झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुटीन चेकअपनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या दरम्यान ए.आर.रहमान यांच्या पूर्वाश्रमीची पत्नी सायरा बानो यांनी केलेल्या एका वक्तव्याची सर्वत्र चर्चा व्हायला लागली.
ए.आर.रहमान यांची तब्येत बिघडल्याचे कळताच सायरा बानो यांनी चिंता व्यक्त केली. सायरा यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. दरम्यान सायरा बानो यांनी त्यांच्या वकील वंदना शाह यांच्यामार्फत एक निवदेन जारी केले. यात 'मी यांच्यासाठी प्रार्थना करते. त्यांना उत्तम आरोग्य लाभो. या कठीण काळात मी त्याच्यासोबत आहे. माझ्यावरही शस्त्रक्रिया झाली आहे. ते लवकर बरे व्हावेत अशी मी देवाकडे प्रार्थना कते. सर्व चाहत्यांचे आभार', असे सायरा यांनी म्हटले आहे.
दरम्यान सायरा बानो यांचा एक ऑडिओ मॅसेजदेखील समोर आला आहे. यात सायरा म्हणतात की, 'नमस्कार मी . मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझा आणि ए.आर.रहमान यांचा अधिकृत घटस्फोट झालेला नाही. आम्ही अजूनही नवरा-बायको आहोत. आम्ही फक्त वेगळे राहत आहोत. मागील दोन वर्षांपासून माझी तब्येत बरी नव्हती आणि त्यांना मी अधिक स्ट्रेस देऊ इच्छित नाही.'
आमचा अजूनही घटस्फोट झाला नाहीये. तेव्हा मी माध्यमांना विनंती करु इच्छिते की मला ए.आर.रहमान यांची एक्स वाईक (पूर्वाश्रमीची पत्नी) म्हणणं बंद करावं. आम्ही वेगळे राहत आहोत. पण त्यांच्यासाठी मी नेहमीच प्रार्थना करते असे देखील सायरा बानो म्हणाल्या. १९ नोव्हेंबर २०२४ रोजी ए.आर.रहमान आणि सायरा बानो हे वेगळे झाले असल्याचे समोर आले होते. १९९५ मध्ये त्यांचा विवाह झाला होता.