VI-John हेल्थकेयर इंडियाने महाकुंभमध्ये दिलेल्या योगदानामुळे व्ही-जॉन हेल्थकेअर इंडियाने एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपले नाव नोंदवले आहे. VI John ने प्रयागराजमधील महाकुंभमध्ये लोकांना ‘व्यवहार प्रशिक्षण' दिले.
इतर संस्थांपेक्षा VI John च्या प्रशिक्षणात हा आकडा जास्त होता. या उपक्रमादरम्यान, तब्बल 10,410 सहभागी लोकांनी ‘ग्रूमिंग प्रतिज्ञा’ घेण्यासाठी एकत्रित आले होते. ही सर्वात मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
यावर बोलताना VI-John हेल्थकेअर इंडियाचे प्रमुख, हर्षित कोचर म्हणाले की, महाकुंभ दरम्यान आम्ही केलेली ही रिकॉर्ड-ब्रेकिंग कामगिरी आमच्या वचनबद्धतेचे प्रमाण आहे. यावेळी, हजारो लोक एकत्रित एकाच मंचावर येण्याची ही संधी देशभरातील लोकांमध्ये आत्मविश्वास आणि आत्मसम्मान निर्माण करणाऱ्या आमच्या मोहीमेची पूर्तता करतात.
VI John India चे मार्केटिंग प्रमुख, आशुतोष चौधरी म्हणाले की, "ग्रूमिंग चा महाकुंभ' महाकुंभ दरम्यान आमचे महत्वाकांक्षी अभियान होते, ज्यामुळे रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमली. आम्ही मोठ्या प्रमाणात लोकांना सेवा प्रदान केली. त्यांना ग्रूमिंगचे महत्त्व पटवून दिले. लोकांनी उत्साहाने सहभागी व्हावे यासाठी आम्ही लोकांकडून प्रतिज्ञाही घेतली. तसेच, सहभागी लोकांना प्रशस्तीपत्रही देण्यात आले.
VI-John च्या कार्यालयात पार पडला विशेष सम्मान सोहळाVI-John च्या कार्यालयात विशेष सन्मान कार्यक्रम पार पडला. यावेळी, प्रतिष्ठीत व्यक्ती, उद्योग जगतातील अनेक दिग्गज यांच्या उपस्थितीत हा रेकॉर्ड देऊन सन्मानित केले गेले. यावेळी, VI-John हेल्थकेयर इंडियाने पर्सनल ग्रूमिंग उद्योग क्षेत्रातील आगामी काळातील कार्यांवर प्रकाश टाकला.