अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद सोपवून केकेआरकडून झाली मोठी चूक? प्लेइंग इलेव्हनबाबत रंगला असा वाद
GH News March 17, 2025 06:13 PM

आयपीएलच्या मागच्या पर्वात श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात कोलकाता नाईट रायडर्सने जेतेपदावर नाव कोरलं. मात्र मेगा लिलावापूर्वी त्याला फ्रेंचायझीने रिलीज केलं आणि संघ बांधणीत अडचणीला सामोरं जावं लागलं. आता कोलकात्याने नव्याने बांधलेल्या संघाची धुरा अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर सोपवली आहे. पण हा निर्णय योग्य की अयोग्य यावरून आता नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. कारण हा वाद आता प्लेइंग इलेव्हनवरून सुरु झाला आहे. अजिंक्य रहाणे कर्णधार असल्याने प्लेइंग 11 मध्ये असणार यात काही शंका नाही. पण कोणत्या स्थानावर खेळणार हा प्रश्न आहे. केकेआरच्या प्लेइंग इलेव्हनबाबत आकाश चोप्राने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. प्लेइंग 11 मध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेला जागा बनवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. आनंद बाजार पत्रिकाच्या रिपोर्टनुसार, केकेआरचा ओपनिंग स्लॉट जवळपास निश्ति आहे. व्यवस्थापनाने सुनील नरीन आणि क्विंटन डिकॉककडून ओपनिंग करायची हे मत तयार केलं आहे. दुसरीकडे, तिसऱ्या क्रमांकावर वेंकटेश अय्यरला संधी मिळेल. त्यामुळे अजिंक्य रहाणे खेळणार कुठे? असा प्रश्न आकाश चोप्राला पडला आहे.

अजिंक्य रहाणे कर्णधार असल्याने प्लेइंग 11 मध्ये असणार यात काही शंका नाही. पण त्याच्यासाठी केकेआर तिसऱ्या क्रमांकाची जागा बदलणार का? आकाश चोप्राच्या मते, केकेआरसमोर एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे सुनील नसरीनच्या जागी रहाणेला ओपनिंगला पाठवू शकते. यामुळे संघाला राइट-लेफ्ट ही ओपनिंग जोडी मिळेल. तर वेंकटेश अय्यरच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर रहाणेला जागा करावी लागेल.

दरम्यान, अजिंक्य रहाणेसाठी चौथ्या स्थानाच पर्यायही आहे. पण एक गोष्ट नक्की म्हणजे, केकेआरच्या प्लेइंग 11 मध्ये अजिंक्य रहाणेच्या जागेवरून पेच आहे. कदाचित श्रेयस अय्यरच्या जागी खेळू शकतो. श्रेयस अय्यर नसल्याने ही जागा आता अजिंक्य रहाणे घेऊ शकतो. त्यामुळे आता केकेआर काय निर्णय घेते याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

केकेआरची संभाव्य प्लेइंग 11 : सुनील नरrन, क्विटंन डि कॉक, वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रमनदीप सिंह, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, स्पेन्सर जॉनसन, एनरिक नॉर्खिया.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.