समृद्धी महामार्गावर बदनापूर तालुक्यातील सोमठाना गावाजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. पहाटे तीन वाजेच्या सुमारास रायपूरहून संभाजीनगरकडे जाणाऱ्या ट्रकने समोर चालत असणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली.या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झालेत. ट्रकचा वेग जास्त असल्याने धडक जबरदस्त होती, अपघातामुळे रोडवरती काही काळ वाहतूक कोंडी झाली होती मात्र या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन पथकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
Aurangzeb Tomb: खुलताबाद येथे पोलीस बंदोबस्त वाढवलाविश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाची कव्हर हटवा अशी मोहीम सुरू केल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण पोलिसांनी खुलताबाद येथे पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कव्हर हटवा अशी मागणी केल्यानंतर त्या मोहिमेला आज सुरुवात होणार असल्याचं सांगण्यात आले होते. त्यामुळे आजही खुलताबाद येथील परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Shiv jayanti: किल्ले शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा तिथीनुसार संपन्नमंत्री नितेश राणे,शिवभक्तांच्या उपस्थितीत पाच महिलांनी पाळणा गात शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न केला यावेळी शिवनेरी गडावर मर्दाणी खेळाची प्रात्याक्षिक सादर करण्यात करण्यात आली.
Beed News: सरपंच हत्या प्रकरण; तृप्ती देसाई आरोपी आणि पोलिसांचे संबंध असल्याचे पुरावे पोलिसांना देणारसरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीं व पोलिसांचे संबंध असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केले होते.बीड पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळत तृप्ती देसाई यांना नोटीस देखील बजावली होती. आता याच नोटीसीला उत्तर देण्यासाठी तृप्ती देसाई या आज सकाळी 11.30 वाजता बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात येणार आहेत या ठिकाणी त्या त्यांच्याकडे असलेले असलेले पुरावे सादर करणार आहेत.आता या भेटीदरम्यान तृप्ती देसाई नेमके कोणते पुरावे सादर करणार आणि पोलिसांच्या नोटिसीला काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
Shivneri Fort: शिवनेरी गडावर शिवप्रेमींवर मधमाशांचा हल्लाशिवनेरी गडावर शिवजन्मोत्सव साजरा होत असताना मधमाशांचा हल्ला झालाय. वनविभागाकडून सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्यात.
विधान परिषद निवडणूक; शिंदे गटाकडून चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी