यजमान पाकिस्तान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील साखळी फेरीतूनच बाहेर पडली. पाकिस्तानला साखळी फेरीतील 3 पैकी 2 सामने गमवावे लागले. तर 1 सामना पावसामुळे रद्द झाला. पाकिस्तान अशाप्रकारे एकही सामना जिंकू शकली नाही. त्यानंतर आता पाकिस्तान नयूझीलंड दौऱ्यावर आहे. पाकिस्तान न्यूझीलंड विरुद्ध 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळत आहे. त्यानंतर उभयसंघात 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. न्यूझीलंडने पाकिस्तानवर मात करत टी 20i मालिकेत विजयी सलामी दिली. त्यानंतर आता दोन्ही संघ दुसऱ्या टी 20i सामन्यासाठी तयार आहेत. न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील दुसरा टी 20i सामना केव्हा आणि कुठे होणार? तसेच सामना कुठे पाहायला मिळणार? हे सर्वकाही सविस्तर जाणून घेऊयात.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20i सामना मंगळवारी 18 मार्चला खेळवण्यात येणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20i सामना युनिव्हर्सिटी ओव्हल, डुनेडिन येथे होणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20i सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी सुरु होईल. तर 6 वाजून 15 मिनिटांनी टॉस होईल.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20i सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20i सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळेल.
पाकिस्तान संघ : सलमान आगा (कर्णधार), मोहम्मद हरीस (विकेटकीपर), हसन नवाज, इरफान खान, शादाब खान, खुशदिल शाह, अब्दुल समद, जहंदाद खान, शाहीन आफ्रिदी, अबरार अहमद, मोहम्मद अली, ओमेर युसूफ, हारिस रौफ, अब्बास आफ्रिदी, उस्मान खान आणि सुफियान मुकेम.
न्यूझीलंड संघ : मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), टीम सायफर्ट, फिन ऍलन, टिम रॉबिन्सन, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल हे (विकेटकीपर), झॅकरी फॉल्केस, कायल जेमिसन, ईश सोधी, जेकब डफी, जेम्स नीशम, बेन सीयर्स आणि विल्यम किंवा विल्यम.