स्त्रीयांच्या सक्षमीकरणाला गती हवी: स्वाती राऊत
esakal March 18, 2025 12:45 AM

स्त्रीयांच्या सक्षमीकरणाला गती हवी: स्वाती राऊत

वाणगाव, ता. १७ (बातमीदार) : स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना गती मिळायला हवी, स्त्रियांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन हा आदराचा असावा, स्त्रियांनी सक्षम बनून स्वतःचा मान सन्मान जागृत ठेवणे गरजेचे असल्याचे मत कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या माजी पर्यवेक्षिका सौ. स्वाती राऊत यांनी व्यक्त केले. एम. के. ज्युनियर कॉलेज चिंचणी व एनएसएस विभागातर्फे महिलांसाठी नुकताच आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य महेशकुमार रावते यांनी '' स्त्रीकडे व्यक्ती म्हणून पाहणे गरजेचे आहे, जेणेकरून समाजात समानता निर्माण होईल असे मत व्यक्त केले. पर्यवेक्षक प्रा. दिनकर टेकनर यांनी जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगा उद्धारी'' या शब्दात स्त्रियांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी समीक्षा गोस्वामी, कस्तुरी मोदले या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रीती राऊत यांनी स्त्रियांनी स्वतःचे हक्क, कर्तव्य व अधिकार यांची जाणीव ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विनी मोरे यांनी तर योगिता पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. स्वज्वल राऊत यांनी आभार तर सूत्रसंचालन वर्षा पाटील यांनी केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.