शहापूर (बातमीदार): बोधगया येथील महाबोधी महाविहार जगभरातील बौद्ध धर्मीयांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. या महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात असावे, यासाठी देशभरात विविध संघटनांकडून आंदोलने केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर कसाऱ्यातील सम्यक संबुद्ध सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. या वेळी बौद्ध अनुयायींनी समतानगर येथून बाजारपेठ मार्गे कसारा पोलिस स्थानकापर्यंत घोषणा देत शांतता रॅली काढली होती. या रॅलीत कोमल शेजवळ, अर्चना जाधव, शीतल मोरे, मीनल शिंदे, शोभा सोनवणे, रिपाइंचे ज्येष्ठ नेते रवींद्र शेजवळ, राज्य उपाध्यक्ष सुहास जगताप, विभागीय अध्यक्ष राजेंद्र उबाळे यांच्यासह शेकडो बौद्ध अनुयायी उपस्थित होते.