कसाऱ्यात गतिरोधक बनवण्याची मागणी
शहापूर (बातमीदार) : कसारा येथील मुख्य बाजारपेठ रस्त्याचे नुकतेच काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे वयोवृद्ध, लहान विद्यार्थ्यांचे अपघात होण्याची शक्यता असल्याने गतिरोधकांची मागणी काँग्रेसने केली आहे.
कसाऱ्यातील ग्रामपंचायत प्रवेशद्वार, टीडीसी बँक, बस स्टॅण्ड, मेंगाळ निवास, खरेशेठ पिठाची गिरणी, शिवसेना शाखा कार्यालय कोळीपाडा, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी सूचनाफलक तानाजी नगर, सिद्धेश्वर मंदिर येथे गल्लीबोळातून अचानक येणाऱ्या वाहनांमुळे अपघातांची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक करण्याची मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे कसारा विभाग अध्यक्ष रमाकांत पालवे यांनी बांधकाम विभागाकडे केली आहे.