Latest Marathi News Updates : चोरी गेलेले अकरा लाखांचे दागिने परत मिळाले
esakal March 18, 2025 11:45 AM
Pune Live: चोरी गेलेले अकरा लाखांचे दागिने परत मिळाले

मध्य प्रदेशातील ज्येष्ठ दांपत्य पुणे रेल्वे स्थानकावर उतरले. तेव्हा बॅगेतील साडेअकरा लाखांचे दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले. मौल्यवान दागिने चोरीस गेल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी चोरट्यांना शोधून काढण्याचा आदेश दिला. लोहमार्ग पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानकासह हरियानापर्यंत दीडशेहून अधिक सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. खबऱ्याची मदत घेत पोलिसांनी चोरट्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून दहा लाख ९३ हजार रुपयांचे दागिने जप्त केले. हे दागिने ज्येष्ठ दाम्पत्याला परत मिळवून दिल्याने त्यांना सुखद धक्का बसला.

शेतकऱ्यांना मिळणार एकरकमी एफआरपी, हायकोर्टाचे आदेश

राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने सोमवारी दिलेल्या आदेशानुसार आता शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळणार आहे. राज्य सरकारने २१ फेब्रुवारी २०२२ रोजी काढलेला आदेशही कोर्टाने रद्द ठरवला आहे.

विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवाराचा अर्ज

विधान परिषद निवडणुकीसाठी एका अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केल्याची माहिती येत आहे. अजित पवारांनी त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत.

Kolhapur Live : कोल्हापूरच्या विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी हिंदुत्ववादी संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचं नाव 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' करावं यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

Nagpur Live : दारु पिऊन शिव्या देत असल्यानं हत्या; नागपुरात खळबळ

नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशन हद्दीत क्षुल्लक कारणावरून एकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करत तपास सुरू केला आहे. अंकुश देवगिरकर असं मृतकाचं नाव आहे. तर आयुष मंडपे असं आरोपीचे नाव असून तो महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. रविवारी रात्री आयुष मंडपे दारू पिऊन शिवीगाळ करत होता. यावेळी अंकुशनं त्याला शिवीगाळ का करतो म्हणून हटकलं. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपीनं घरी जाऊन चाकू आणला आणि पियुषवर सपासप वार केले. यात अंकुशचा मृत्यू झाला. क्षुल्लक कारणावरून झालेल्या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

Nashik LIve : पाणी येत नसल्यानं नळाला हळदी-कुंकू वाहून केली प्रार्थना

नाशिकच्या सिडको परिसरात पाणी येत नसल्यानं नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पाण्यासंदर्भात वारंवार तक्रारी करून आणि आंदोलन करून प्रशासन कुठल्याही पद्धतीची दखल घेत नसल्यानं थेट नळालाच हळदीकुंकू वाहत पुष्पहार अर्पण करून पाण्यासाठी प्रार्थना करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या सिडको परिसरात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांकडूनच पाण्यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे.

साताऱ्यात हापूसच्या मानाच्या पेटीला २० हजार रुपये बोली

साताऱ्यातील बाजार समितीत देवगड हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीला उच्चांकी बोली लावण्यात आली. एका व्यापाऱ्यानं तब्बल २० हजार रुपये बोली लावून पहिली मानाची पेटी मिळवली.

Kolhapur : प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू

प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. कोरटकरचे वकील सौरभ घाग हे युक्तिवाद करत आहेत. तर दुसऱ्या बाजूने असीम सरोदे युक्तिवाद करणार आहेत.

पुण्यातली हानीकारक सौंदर्यप्रसाधनं पाकिस्तानमध्ये तयार झालेली, मंत्री झिरवाळांचा खुलासा

पिंपरी चिंचवड इथं सापडलेली हानीकारक सौंदर्यप्रसाधने पाकिस्तानात तयार झालेली असल्याचा अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांचा खुलासा

पुण्यातील भाजपचे आमदार भिमराव तापकीर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मंत्र्यांचे उत्तर

विक्रेत्यांवर लवकरच खटला दाखल करण्याचे सरकारकडून आश्वासन

या सौंदर्य प्रसाधनांमध्ये स्टेरॉईडसचे प्रमाण अधिक असून ते त्वचेसाठी हानीकारक असते

बजरंग दलाकडून औरंगजेबाच्या कबरीच्या फोटोवर हातोडा चालवून निदर्शने

विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी राहाता मधील छत्रपती शिवाजी चौकात निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी नगर -मनमाड महामार्गावर घोषणाबाजी करत औरंगजेबाच्या कबरीच्या फोटोवर हातोडा चालवून राग व्यक्त केला.

Jalna Live: जालन्यात सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकची आयशा ट्रकशी धडक, चालक जागीच ठार

जालन्यामध्ये सळई घेऊन जात असलेल्या ट्रकला आयशा ट्रकची धडक बसली. त्यात चालकाचा जागीच मृत्यू झाल्याचे समजत आहे.

Beed live: बीडमधील विकास बनसोडे हत्या प्रकरणात सहाजणं ताब्यात, तर चार फरार

बीड जिल्ह्यातील विकास बनसोडे हत्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून ६ जणांना अटक करण्यात आली आहे, तर चारजण मात्र फरार आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात भारतीय नौदल अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला

जागतिक भू-राजकीय तणाव वाढत असताना, देश सागरी सहकार्य वाढवत आहेत आणि संयुक्त सराव करत आहेत.

पेट्रोल देण्यास नकार दिला म्हणून लोखंडी रॉडने हल्ला Live Update: बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

औरंगजेबाची कबर कायमची नष्ट करून महाराष्ट्रातून हटवावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. मुंबईतील वांद्रे पूर्व येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. बजरंग दलाचे जिल्हा महामंत्री गौतम रावरीया यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत असून, औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे.

Live Update: नरेंद्र मोदी आणि क्रिस्टोफर लक्सन यांच्यात हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्यात हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय चर्चा पार पडली.

Live Update: न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून घेतली शपथ

न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.

Live Update: सर्व सदस्यांच्या मागण्यांची नोंद घेतली- अजित पवार

सर्व सदस्यांच्या मागण्यांची नोंद घेतली असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहे.

Live Update: संजय खोडकेंकडून उमेदवारील अर्ज दाखल

संजय खोडकेंकडून उमेदवारील अर्ज दाखल केले आहे.

Live Update: 'औरंगजेबाचं महिमामंडन कधीच होणार नाही'- देवेंद्र फडणवीस

औरंगजेबाचं महिमामंडन कधीच होणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Live Update: हर्षवर्धन सपकाळांच्या विधानामुळे विधानपरिषदेत गोंधळ

देवेंद्र फडणवीस देखील औरंगजेबासारखे आहे असे विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केल्यानंतर विधानपरिषदेत गोंधळ निर्माण झाला आहे.

Live Update: औरंगजेबाची कबर नष्ट करा , नरेश मस्केची मागणी

औरंगजेबाची कबर नष्ट करा अशी मागणी नरेश मस्के यांनी केली आहे.

Live : खोक्या भोसले तुरूंगात अन्नत्याग आंदोलन करणार

बीडच्या शिरूर येथील ढाकणे पिता पुत्राला अमानुष मारहाण प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या सतीश भोसलेने आता अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला.. सतीश भोसले याच्या कुटुंबाला मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करावी. या मागणीसाठी सतीश भोसले हा पोलीस कोठडीत अन्नत्याग आंदोलन करणार आहे.

Pune Live : पुण्यातील आंबेगाव परिसरात कोयता दाखवत दहशत माजवण्याचा प्रयत्न

पुण्यातील आंबेगाव परिसरात कोयता दाखवत दहशत माजवण्याचा प्रयत्न

चहाच्या टपरीवर पैसे देण्यावरून टोळक्याने चक्क घरात घुसूत कोयत्याने धाक दाखवण्याचा प्रयत्न

पुण्यातील आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना

चहाच्या टपरीवर चहा पिल्यानंतर आरोपींनी पैसे का दिले नाहीत या कारणावरून हटकल्याने त्या इसमाच्या घरात जाऊन तिघाजणांकडून कोयत्याने धाक दाखवण्याचा प्रयत्न

आंबेगाव पोलीस स्टेशन मध्ये ३ आरोपींविरोधात गुन्हा दाखल

Pune Live : पुण्यात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची आंदोलन

औरंगजेबाची कबर शासनाने लवकरात लवकर काढावी या मागणीसाठी आंदोलन

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येतेय

महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर ही कबर काढावी अन्यथा बजरंग स्वाभिमान हिंदू समाजाला घेऊन रस्त्यावरून उतरून आंदोलन करेल मोर्चेत काढेल.

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर आज एकाच वेळी आंदोलन केलं जात आहे.

काही वेळात सुरू होईल लाईव्ह फ्रेम देतो

Live : विधानपरिषदेसाठी अजित पवार गटाकडून संजय खोडके यांना उमेदवारी

विधानपरिषदेसाठी अजित पवार गटाकडून संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Donald Trump Live Updates: डोनाल्ड ट्रम्प ४३ देशांच्या नागरिकांवर नवीन प्रवास निर्बंध लादणार

अमेरिकेतील ट्रम्प प्रशासन पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसह ४३ देशांच्या नागरिकांवर नवीन प्रवास निर्बंध लादणार. सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशींच्या मसुद्याच्या यादीमध्ये प्रवास प्रतिबंधित करण्यासाठी देशांना तीन गटांमध्ये वर्गीकृत करण्याचा प्रस्ताव आहे - लाल, नारंगी आणि पिवळा.

Nirmala Sitharaman Live Updates: पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी अॅप लाँच करणार- अर्थमंत्री निर्मला सीतारमण

अर्थमंत्री निर्मला सीतारमण पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी एक समर्पित अॅप लाँच करणार.

Delhi Live : दिल्लीतील जंतरमंतरवर मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात

वक्फ (दुरुस्ती) विधेयक २०२४ विरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (AIMPLB) च्या सुरू असलेल्या निषेधादरम्यान दिल्लीतील जंतरमंतरवर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Bhivandi Live : भिवंडीतील शिवाजी महाराजांच्या मंदिराचे आज लोकार्पण

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य अशा या  मंदिराच्या लोकार्पणाचा आणि प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा आज संपन्न होणार असून या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

EPF Pensioner LIVE : ईपीएफ पेन्शनरांचा उद्या कोल्हापुरात मोर्चा

चिपळूण : ईपीएफ पेन्शनर संघांच्या अखिल भारतीय समन्वय समितीतर्फे येत्या मंगळवारी (ता. १८) कोल्हापूरच्या प्रोव्हिडंट फंड कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व विभागीय कार्यालयांवर हा धडक मोर्चा निघणार आहे. प्रोव्हिडंट फंड कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी पेन्शनरांची व देशाची फसवणूक करत आहेत. राज्यघटनेने दिलेली जबाबदारी टाळत आहेत. त्यामुळे तीव्र आंदोलानाखेरीज मार्ग नाही, या निष्कर्षाला समन्वय समिती आली आहे. प्रत्येकाला किमान ९ हजार रुपये पेन्शन, अधिक महागाई भत्ता, प्रवासात सवलत, संपूर्ण मोफत वैद्यकीय सेवा इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा होणार आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Mangalore CCB Police : बंगळुरात ७५ कोटींचे अमली पदार्थ जप्त, मंगळूर सीसीबी पोलिसांची कारवाई

बंगळूर : कर्नाटक राज्याच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या अमली पदार्थ विरोधी कारवाईत, बंगळूर शहरात ७५ कोटी रुपये किमतीचे ३७.८७ किलो एमडीएमए (मिथाइलेनेडिऑ िक्समेथॅम्फेटामाइन) या ड्रग्जचा साठा जप्त केला. मंगळूर सीसीबी पोलिसांनी गेल्या पाच महिन्यांपासून या रॅकेटचा तपास करीत कारवाई केली आणि दोन परदेशी महिलांना अटक केली.

Manickam Tagore LIVE : NEET पेपर लीकवर चर्चा करण्यासाठी लोकसभेत काँग्रेस खासदाराकडून प्रस्ताव सादर

काँग्रेस खासदार माणिकम टागोर यांनी NEET पेपर लीकसह परीक्षेच्या पेपर लीकवर चर्चा करण्यासाठी लोकसभेत स्थगन प्रस्ताव दाखल केला असून सरकारने ते रोखण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, असे त्यांनी म्हटले आहे.

Sangli City Police LIVE : बांगलादेशी घुसखोरास सांगलीत अटक

सांगली : कायदेशीर परवान्याशिवाय भारतात घुसखोरी करत सांगलीत वावरणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाला सांगली शहर पोलिसांनी अटक केली. आमीर शेख या नावाने बानावट कागदपत्रे तयार केली असून त्याचे मूळ नाव आमीर हुसेन असे आहे.

Shivaji University LIVE : शिवाजी विद्यापीठ नामविस्तारासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

कोल्हापूर : ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यात यावा, अशा मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र समन्वय समितीतर्फे आज, सोमवारी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. दसरा चौकातून या मोर्चाची सुरुवात होणार आहे.

Prashant Koratkar LIVE : प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनावर आज महत्त्वाची सुनावणी

कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या प्रशांत कोरटकर याने जिल्हा व सत्र न्यायालयातून मिळवलेल्या अंतरिम जामिनावर सोमवारी सुनावणी होणार आहे. कोरटकरविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कोरटकरला न्यायालयात हजर करावे, अशी पोलिसांची मागणी यापूर्वीच न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी फेटाळली आहे. सोमवारी कोरटकरच्या अंतरिम जामिनाबाबत सरकारी पक्ष व बचाव पक्षाकडून युक्तिवाद होणार आहे.

Vidhan Parishad Election LIVE : विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी 27 मार्चला निवडणूक होणार

Latest Marathi Live Updates 17 March 2025 : बलुचिस्तान प्रांतातील नोश्की जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर पाकिस्तानी सैनिक व अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसवर एक मोटार वेगाने धडकवून केलेल्या हल्ल्यात ९० सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा स्थानिक माध्यमांनी केला आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून सोन्याच्या दरात सातत्याने मोठी वाढ होत असून, आता चांदीनेदेखील सुवर्णभरारी घेतली आहे. चांदीने प्रतिकिलो एक लाख रुपयांचा टप्पा पार केला आहे. महाराष्ट्रातील विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी २७ मार्चला निवडणूक होणार आहे. भाजपने संदीप दिवाकरराव जोशी, संजय किशनराव केनेकर आणि दादाराव यादवराव केचे यांना उमेदवारी दिली आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या प्रशांत कोरटकर याने जिल्हा व सत्र न्यायालयातून मिळवलेल्या अंतरिम जामिनावर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात आता बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.