गायक आणि रॅपर यो यो हनी सिंग (Yo Yo Honey Singh) कायमच त्याच्या गाण्यामुळे चर्चेत असतो. आजवर त्याने अनेक हटके रॅपर गायले आहेत. हनी सिंगचा मोठा चाहता वर्ग आहे. तो कायमच आपल्या हटके स्टाइलमुळे चर्चेत राहीला आहे. अलिकडेच हनी सिंगचा पुण्यात कॉन्सर्ट पार पडला. या कॉन्सर्टला तुफान गर्दी पाहायला मिळाली आहे.
कॉन्सर्टचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये यो यो हनी सिंग मराठीत गाणे बोलताना आणि प्रेक्षकांशी संवाद साधताना दिसत आहे. रॅपर यो यो हनी सिंगने पुण्यात झालेल्या कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांसोबत संवाद साधला आहे. तसेच त्याने मराठीत हटके स्टाइलमध्ये गाणे देखील म्हटले आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सिंगने मराठीत साधलेल्या संवादामुळे पुणेकर भलतेच खुश झाले आहेत. व्हिडीओमध्ये हनी सिंग म्हणतो की, "कसा आहेस? ये फोटो काढणारे... तुझ्या आईला मी सांगतो" हे ऐकताच प्रेक्षक ओरडायला लागतात. त्यांना खूप आनंद होतो. पुढे हनी सिंग मराठीत गाणे गातो. तो 'ढगाला लागली कळ' (Dada Kondke - Dhagala Lagali Kala) हे लोकप्रिय गाणे गाऊन प्रेक्षकांचे मनं जिंकतो. हे गाणे अभिनेता दादा कोंडके यांचे आहे. त्यांच्या स्टाइलचे तर चाहते आजही दिवाने आहेत. पुढे हनी सिंग म्हणतो की, "मला प्रत्येक भाषा माहित आहे. इंडिया इज माय हॉर्ट...म्हणून मी इंडियासाठी खूप सारे हॉर्ट घेऊन आलो आहे. "
हनी सिंगने कॉन्सर्टसाठी पांढऱ्या रंगाचे शर्ट परिधान केले होते. ज्यावर खूप हॉर्ट दिसत होते. हनी सिंगच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अलिकडेच 'यो यो हनी सिंग फेमस' ही हनी सिंगच्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंटरी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर पाहता येते. हिला चाहत्यांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे.