Sunita Williams: भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी अंतराळातून पृथ्वीवर परतणार आहे. आठवडाभरासाठी गेलेली सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर स्टारलाइनरमधील बिघाडामुळे नऊ महिने अंतराळात अडकले. आता ते 19 मार्च रोजी पृथ्वीवर परत येणार आहेत. त्यांचे हे नऊ महिने कसे होते, अंतराळ स्थानकात दिवस कसे होते, अंतराळ स्थानकात राहणे किती अवघड आहे? जाणून घेऊ या सर्वकाही…
पृथ्वीपासून ४०४ किलोमीटर उंचीवर अंतराळ स्थानक तयार करण्यात आले आहे. त्या ठिकाणी अंतराळवीर संशोधनासाठी जातात. या अंतराळ स्थानकात सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे ५ जून २०२४ रोजी गेले होते. त्यांचा मुक्काम केवळ एका आठवड्यासाठी होता. परंतु त्यांना तब्बल ९ महिने त्या ठिकाणी थांबावे लागले. या ठिकाणी राहणे खूपच अवघड आहे. कारण अंतराळ स्थानक २८ हजार १६३ किलोमीटर वेगाने पृथ्वीला प्रदर्शना घालत असतो. त्यामुळे त्या ठिकाणी २४ तासांत १६ वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त होते. त्या ठिकाणी ९० मिनिटांत दिवस संपतो. १७,५०० मैल प्रतितास वेगाने अंतराळ स्थानक प्रवास करते. याचा अर्थ ते दर ९० मिनिटांनी पृथ्वीला प्रदक्षिणा घालते. आता सुनीता विल्मस आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर परतण्यासाठी १७ तासांचा कालावधी लागणार आहे. त्यांचे यान अमेरिकेतील फ्लोरिडा किनाऱ्याजवळ पाण्यात उतरणार आहे.
अंतराळ स्थानकात १३ जण काही दिवसांसाठी राहू शकतात. परंतु दीर्घकाळ राहण्यासाठी सहा ते सात जणच थांबू शकतात. त्या ठिकाणी जेवण पॅक फूड असते. ते गरम करुन खावे लागते. पाणी रिसायक्लिंग करुन मिळते. मूत्र आणि घाम शुद्ध केले जाते. पाण्यातून हायड्रोजन वेगळा काढून ऑक्सीजन तयार केला जातो. ऑक्सीजन सिलेंडर आणि जनरेटर त्या ठिकाणी असतात.
४.५ लाख किलोग्रॅम वजनाच्या अंतराळ स्थानकात जास्त वस्तू ठेवता येत नाही. अंतराळवीर या ठिकाणी प्रयोग करतात. अंतराळ स्थानकाची देखभाल करण्याचे काम ते करतात. या ठिकाणी ते नियमित व्यायम करतात. हे अंतराळ स्थानक एखाद्या फुटबॉल मैदाना इतके मोठे आहे.
आता तयार करण्यात आलेले आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला भाग नोव्हेंबर १९९८ मध्ये प्रक्षेपित करण्यात आला. एका रशियन रॉकेटने रशियन झारिया (झार ईई उह) नियंत्रण मॉड्यूल प्रक्षेपित केले.