Sambhajinagar Crime: संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह रील, पोलिसांनी २ तरुणांना ठोकल्या बेड्या
Saam TV March 18, 2025 05:45 PM
माधव सावरगावे, संभाजीनगर

छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणांना संभाजीनगर पोलिसांनी अटक केली. 'छावा' चित्रपटाचे पोस्टर लावून महापुरुषांविषयी आक्षेपार्ह भाष्य करणारी एक रील या तरुणांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक पोलिस ठाण्यात दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली.

अभिनेता विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाचे पोस्टर लावून संभाजीनगरमधील दोन तरुणांनी महापुरुषांविषयी आक्षेपार्ह भाष्य करणारी रील इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. जोहेब शोएब पठाण आणि तौफिक अहमद इद्रीस या दोघांना सिटी चौक पोलिसांनी अटक केली. त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. जोहेब पठाणने आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. यावरून त्याच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या दोन तरुणांविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली.

तर मध्ये देखील अशीच घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबईमध्ये एका २६ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली. विक्रोळीमधील पार्कसाईट पोलिसांनी अरबाज खान नावाच्या तरुणाला याप्रकरणी अटक केली. धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली. इन्स्टाग्रामवर छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात या तरुणाने आपत्तीजनक वक्तव्य केले होते. पार्कसाईट पोलिसांनी त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २९९ अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.