मालवण शहर, परिसरात
दिवसआड पाणीपुरवठा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १८ : मालवण शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी धामापूर येथून येणारी २०० मि.मी.ची मुख्य वाहिनी कासारटाका येथे चौके-कुडाळ मुख्य रस्त्यामध्ये जीर्ण होऊन फुटल्यामुळे मुख्य वाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामासाठी किमान चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत मालवण शहर आणि अन्य भागात एक दिवसआड आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. मुख्य रस्त्यावरच वाहिनीचे काम असल्याने प्रसंगी सलग दोन दिवसही पाणीपुरवठा बंद राहू शकतो. सर्व नळधारकांनी आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.