Maharashtra Live Update : प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
Saam TV March 19, 2025 12:45 AM
प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे

प्रशांत कोरटकर याचा जामीन नामंजूर

Navi Mumbai : नवी मुंबईत रेल्वे स्थनकावरील सफाई कर्मचाऱ्यांचे सिडकोच्या कार्यालयासमोर 'भीक मागो' आंदोलन

नवी मुंबईतील वाशी ते बेलापूर स्थानकावरील सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतनापेक्षा कमी व वेळेवर पगार मिळतं नसल्यामुळे त्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं. वारंवार पत्रव्यवहार करूनदेखील पगार मिळतं नाही, सामान काम समान वेतन कायद्यानुसार आम्हाला वेतन मिळणार होते पण तसं होतं नाही, आम्ही आमचं कुटुंब कसं चालवायचं हा आमच्यापुढे प्रश्न आहे. तर कंत्राटदाराचे सिडकोकडून बिल पास होतं नसल्यामुळे आम्ही सिडको कार्यालयासमोर भीक मागत आहोत. मिळालेले पैसे आम्ही सिडकोला देणार आहोत, असे आंदोलकांनी सांगितले. पुढील 7 दिवसात आमचे वेतन न दिल्यास कामं बंद आंदोलन करण्याचा इशारादेखील देण्यात आलाय.

यवतमाळात 60 गोवंशासह 45 लाखांचा मुद्देमाल जप्त

कत्तलीसाठी कंनेटरमधून ६० बैलजातीचे गोवंश हैदराबाद येथून घेऊन जात असल्याची माहिती यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून राष्ट्रीय महामार्गावरील पिंपरी गावाजवळ गोवंश घेऊन जाणाऱ्या कंनेटरला थांबवण्यात आलं त्याची पाहणी केली असता त्यात ६० बैल आढळून आले. यामध्ये मध्यप्रदेश,राज्यस्थान येथील तीन आरोपींना अटक करून तब्बल ४५ लाख ५ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपीविरुद्ध पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये प्राणी क्रुरता प्रतिबंध अधिनियम, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Solapur News: सोलापूरमधील कॉलेजच्या इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या

दयानंद कॉलेजच्या इमारतीवरील तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत विद्यार्थ्याने आत्महत्या केलीय. कॉलेजमध्ये असाइनमेंट देण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मोबाइल स्विच ऑफ लागल्याने आई-वडिलांनी शोध घेतला. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. प्रीतम नीलेश राऊत असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. प्रीतम डी.बी.एफ. दयानंद महाविद्यालयात एम. कॉमच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता.

Dhule Crime: विदेशी दारू तस्करी प्रकरणी दोघांना अटक, धुळे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या विदेशी दारू आणि बिअरची तस्करी करणाऱ्या दोघा आरोपींना अटक केली आहे, पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 1 लाख 33 हजार 325 रुपये किमतीची विदेशी दारू आणि बिअर तसेच 5 लाख रुपये किमतीची हुंडाई आय-20 कार जप्त केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी मोहाडीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालेगाव-धुळे महामार्गावर लक्झील होम डेकॉर शॉपजवळ सापळा रचला.

पोलिसांना संशयास्पद कार दिसताच त्यांनी तिचा पाठलाग करून तिला थांबवले, कारची झडती घेतली असता मागील सीटवर आणि डिक्कीत असलेल्या मोठ्या बॉक्ससारख्या कप्प्यात विविध कंपन्यांची विदेशी दारू आणि बिअर सापडली आहे, या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली आहे, या प्रकरणी मोहाडीनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhandup Fire: भांडुपमधील वेल्डिंग दुकानाला भीषण आग

भांडुपमधील गौतमनगर येथील ग्राउंड प्लस वन असलेल्या वेडिंग दुकानाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडलीय.घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या. आगीवरती नियंत्रण देखील अग्निशमन दलाने मिळवले आहे. यात कुठलीही जीवितहानी झाली. मात्र दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Accident News: रत्नागिरी-मुंबई गोवा महामार्गावर दोन कारचा अपघात, ओव्हरटेक करताना झाली धडक

रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक झालीय. हा अपघात खेड लवेल येथे झालाय. धडकेनंतर एक कार रस्त्यावर पलटी झाली. तर दुसरी कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षक कठड्यावर आपटली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र दोन्ही कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. ओव्हरटेक करत असताना करताना झाला अपघात.अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांत उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Swargate: स्वारगेट अत्याचार प्रकरण; आरोपी दत्ता गाडेच्या वकीलावर हल्ला

स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचे वकील साहील डोंगरे यांच्यावर हल्ला झालाय. ⁠काल संध्याकाळी हडपसर येथून डोंगरे यांचे अपहरण करुन त्यांना बोपदेव घाटात नेण्यात आले. ⁠दिवे घाटात त्यांना मारहाण करुन सोडून देण्यात आले. ⁠मारहाण झाल्यानंतर डोंगरे यांनी जखमी अवस्थेत हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ⁠हल्याचं कारण अद्याप स्पष्ट नाहीये. ⁠ॲडव्होकेट डोंगरे यांच्यावर ससून रुग्णालयात करण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने देशमुख कुटुंबाला मिळणार हक्काचे घर

सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना शिवसेना शिंदे गटाकडून हक्काचं घर बांधून दिले जात आहे. याचेच भूमिपूजन आज श्रीक्षेत्र नारायण गड संस्थानचे मठाधिपती शिवाजी महाराज यांच्या हस्ते केले जाणार आहे.

सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबाची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. त्या नंतर शिंदे यांच्या संकल्पनेतून देशमुख कुटुंबाला नवे पक्के घर बांधून दिले जाणार आहे. याचेच भूमिपूजन आज होणार आहे. नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी महाराज, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक यांची यावेळी उपस्थिती असणार आहे.

कम्युनिस्ट पक्षाचा वन विभाग कार्यालयवर बिऱ्हाड मोर्चा विविध मागण्यासाठी कार्यालयाला घेराव

गेल्या अनेक वर्षांपासून वन जमीन वर अनेक वर्षांपासून गाव पाडे वसलेले असून शासनाने वनपट्टे वाटप केले मात्र या पाड्यात अद्याप ही सुख सुविधा पोहोचली नाही रस्ते, लाईट, पाणी असे अनेक सुविधा उपलब्ध होत नाही प्रत्येक वेळा वन विभागाची अडचणी येतात अडचणी सोडविण्यासाठी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा मार्फत वन विभाग वन्य जीव कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आले.

Pune: भारती पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले

पुण्यातील वैकुंठ स्मशान भूमी मध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले

त्यानंतर त्यांच्या पार्थिवास अग्नी देण्यात आला

यावेळी संपूर्ण पवार कुटुंबीय ज्यामध्ये प्रतापराव पवार, शरद पवार, अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

सतीश उर्फ खोक्या भोसलेची बीड शहर पोलीस ठाण्यात रवानगी

- शिरूर कासार न्यायालयाने पोलीस कोठडी सूनावल्या नंतर 3 दिवस शिरूर पोलीस ठाण्यात होता मुक्काम.

- सुरक्षेच्या कारणास्तव सतीश उर्फ खोक्या भोसलेला बीड शहर पोलीस ठाण्यात ठेवल्याची माहिती.

- मध्ये रात्री बारा वाजता शिरूर कासार पोलीस ठाण्यातून बीड शहर पोलीस ठाण्यात रवानगी.

- 20 मार्च रोजी संपणार आहे सतीश उर्फ खोक्या भोसलेची पोलीस कोठडी.

Nandurbar: जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसपर्यंत

वाढत्या तापमानाचा फळ बागायतदार शेतकऱ्यांना मोठा फटका....

केळी आणि पपई चे फळ खराब होण्याची शक्यता....

तापमानात अजून वाढ होण्याचा हवामान खात्याचा अंदाज....

वाढत्या उष्णतेपासून फळबागांच्या संरक्षणासाठी गोणपाट आणि इतर आच्छादनांचा वापर......

पपईच्या फळांची उष्णतेपासून बचाव करण्यासाठी फळांवर गोणपाट आणि इतर अच्छदनाचा वापर....

एप्रिल आणि मे मध्ये अजून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता..

पुणे पोलीस करणार साडेसात कोटी रुपयांच्या ड्रग्सची होळी

पुणे पोलिसांकडून मागील वर्षात पकडलेल्या साडेसात कोटी रुपयांच्या ड्रग्सची 25 मार्चला होळी करण्यात येणार आहे...

मात्र यामध्ये कुरकुंभ ड्रग्स प्रकरणात पकडण्यात आलेले 3674 कोटीच्या ड्रुग्सचा समावेश नसणार आहे.

ती प्रक्रिया एप्रिल महिन्यात पार पाडली जाणार आहे...

Pune: पोर्शे कार अपघात प्रकरणाची लवकरच न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होणार

या प्रकरणामध्ये सध्या एक प्रकरण बाल न्यायालयामध्ये, तर दुसरे प्रकरण शिवाजीनगर सत्र न्यायालयात सुरू होणार.

लवकरच सत्र न्यायालयातील खटल्याची सुनावणी होणार आहे.

विशेष सरकारी वकील म्हणून शिशिर हिरे हे असणार आहेत.

बाजारपेठमध्ये योग्य हमीभाव भेटत नसल्यामुळे भंडाऱ्यातील गुळ उत्पादक शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती

भंडारा जिल्ह्यात तुमसर - मोहाडी या परिसरात मोठ्या प्रमाणात गुळ उत्पादन घेतले जाते.

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश येथील सीमा लगतच्या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात गुळ उत्पादन घेतले जाते.

गुळाला योग्य भाव मिळावा यासाठी अनेक शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळ विकायला व्यापाराकडे आणत असता.

मागील वेळी पेक्षा यंदा त्याच भावात व्यापाराकडून गुडाची बोली लागत आहे. मागील वेळी 4200 ते 4500 हजार इतका दर एका गुळाच्या बोरीला मिळत होता.

मात्र आता 3500 रुपये इतका दर मिळत असल्याने. गुड उत्पादन परवडत नसल्याचे शेतकरी सांगत आहे.

दिवसेंदिवस वाढलेली महागाई. व मजुराच्या खर्च वयेण्याजाण्याच्या खर्च सुद्धा निघत नसल्याने जिल्ह्यातील गुळ उत्पादक शेतकरी संकटात सापडल्याची चित्र दिसत आहे.

Nashik: प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये सर्व सरकारी कार्यालयांना व सर्व विभागांना 100 दिवस एकसूत्री कार्यक्रम राबवण्याच्या सूचना दिल्या आहे.

यानुसार माझी वसुंधरा या स्वच्छता मोहिमेअंतर्गत येवला नगरपालिकेच्या माध्यमातून प्रांताधिकारी कार्यालय, पंचायत समिती, तहसील कार्यालय, पोलीस पाटील संघटना आदींनी मिळून येवला प्रशासकीय संकुलात स्वच्छता मोहीम राबवत तब्बल पाच टन कचरा संकलित केला आहे.

या मोहिमेमुळे प्रशासकीय कार्यालय स्वच्छ झाले असून यापुढेही अशा मोहीम राबवल्या जातील अशी माहिती प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी दिली.

याप्रसंगी तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी तुषार आहेर, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी पोलीस पाटील संघटनेचे सदस्य नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते

Pandharpur: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर सुरक्षेची ऐशी तैशी; मंदिर परिसरात दररोज भरतो बाजार

महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुरक्षेचे तीन तेरा वाजले आहेत.

मंदिर परिसरातील व्हीआयपी रस्त्यावर दररोज फेरी वाल्यांनी अक्षरश: बाजार मांडला आहे. या बाजारामुळे विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकांना त्रास सहन करावा लागतो.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे संवेदनशील आहे.

मंदिराच्या सुरक्षेसाठी 24 तास पोलिसांचा खडा पहारा आहे. शिवाय खास मंदिराच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलिस निरीक्षक आणि पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची असताना देखील पोलिस मात्र या संपूर्ण प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.

Beed: शिक्षक धनंजय नागरगोजे आत्महत्या प्रकरणात संस्था चालकासह इतरांवर गुन्हा दाखल

विनाअनुदानित आश्रम शाळेवरील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी 15 मार्च रोजी गळफास घेऊन बीड शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या आवारात आत्महत्या केली होती..

या प्रकरणात समाज कल्याण विभागातील कार्यालयीन अधीक्षक श्रीकांत घुले यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संस्थेचे अध्यक्ष विक्रम मुंडे, सचिव अतुल मुंडे यांच्यासह इतरां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला..

संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी धनंजय नागरगोजे यांना वेतन दिले नाही. तसेच वेतनाबाबत विचारणा केली असता तू फाशी घे... म्हणजे तू मोकळा... असे म्हटल्याचे आत्महत्या केल्याच्या पोस्टमध्ये नमूद आहे.

Matheran: आजपासून माथेरान बेमुदत बंद

थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरान मधील वातावरण सध्या चांगलंच तापलंय.

माथेरान मध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या फसवणुकी विरोधात माथेरान कर एकवटले आहेत.

आजपासून माथेरान बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे.

त्यामुळे माथेरान मधील सर्व व्यवहार आज बंद ठेवण्यात आले आहेत. माथेरान मधील, दुकाने, हॉटेल्स, लॉजेस यासह इतर व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत.

एरव्ही पर्यटकांनी गजबजलेल्या माथेरानच्या रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळतो आहे.

माथेरानचे टॅक्सीचालक यांच्याकडून पर्यटकांची लूट केली जातेय त्यामुळे माथेरान बदनाम होत असून इथल्या व्यवसायावर त्याचा परिणाम होत आहे.

याविरोधात माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून हा बंद पुकारण्यात आला आहे.

Maharashtra Live Update: विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी विरोधक आमने-सामने

औरंगजेबाच्या कबरीचे विधीमंडळात पडसाद

विधीमंडळाच्या पायऱ्यांवर गोंधळ

सत्ताधारी विरोधक आले आमने-सामने

Navi Mumbai: खारघर सेक्टर 13 येथील दुर्गा सदन सोसायटी मध्ये अज्ञात इसमाने गाड्यांचे केले नुकसान

सेलेरो कार आणि दोन दुचाकीचे केले नुकसान.

अज्ञात इसम cctv मध्ये झालाय कैद.

चारचाकी वाहनाचे काचा फोडल्या तर दुचाकीचे आरसे फोडले.

खारघर पोलीस घेतायत अज्ञात इसमाचा शोध.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा २५ मार्चपासून

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा दि. २५ मार्चपासून होणार सुरू

सर्व परीक्षांचे वेळापत्रक लवकरच होणारच आहे

प्रशासनाला परीक्षेच्या तयारी करण्याच्या कुलगुरूंच्या सूचना

वैश्या व्यवसायासाठी महिला पुरवणारा आरोपी पोलीस ठाण्यातूनच फरार

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने नेरुळ मधील सत्यम हॉटेल वर छापा टाकत पाच महिलांची सुटका केली होती.

सदर कारवाई नंतर गुन्हा दाखल करण्यासाठी वैश्या व्यवसायासाठी महिला पुरवणाऱ्या आरोपीला घेऊन नेरुळ पोलीस ठाण्यात आले असता.

आरोपी साहिल उर्फ शाहीन मंडल याने थेट नेरुळ पोलीस ठाण्यातूनच पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आलेय.

पोलीस ठाण्यातूनच पोलिसांच्या नजरेसमोरून आरोपी फरार झाल्याने नेरुळ पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

त्यामुळे कामात निष्काळजीपणा करणाऱ्या नेरुळ पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर पोलीस आयुक्त काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Pune News: किरकोळ बाजारात एक लिंबू दहा रुपयांना

उन्हाचा चटका वाढल्याने लिंबांच्या मागणीत माेठी वाढ

उन्हाळ्यात रसवंतीगृह चालक, सरबत विक्रेते, तसेच घरगुती ग्राहकांकडून लिंबांच्या मागणीत वाढ

किरकोळ बाजारात एका लिंबाची विक्री आठ ते दहा रुपये दराने

उन्हाचा चटका वाढल्यानंतर लिंबांना मागणी वाढली असून, सध्या बाजारात लिंबांची आवक कमी प्रमाणावर

सध्या बाजारात दररोज साधारणपणे १५०० ते १६०० गोणी लिंबांची आवक

Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! पुणे शहरातील GBS रुग्णांची रुग्णसंख्या घटली

पुण्यातील GBS चे 80 टक्के रुग्ण झाले बरे

जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या जीबीएस रुग्णांचा उद्रेक आता मार्च महिन्यात कमी होताना पाहायला मिळत आहे

पुण्यात आतापर्यंत 230 रुग्णांचे निदान झाले असून त्यापैकी 183 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत

पुण्यात सध्या 35 रुग्णांवर उपचार सुरू

GBS मुळे आत्तापर्यंत 12 जणांचा मृत्यू

उष्णतेपासून गाय-म्हशींचा बचाव करण्यासाठी गोठ्यात फॉगरचा वापर

सध्या मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून तापमानात वाढ झाल्याने मनुष्या बरोबरच जनावरांनाही उन्हाच्या तीव्र झळा बसताय.

जनावरांचा उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नाशिकच्या येवला तालूक्यातील नांदूर येथिल शेतकरी चेतन पुरकर या तरुण शेतक-याने शक्कल लढवत गोठ्यात फॉगरचा वापर केला आहे,

उष्णतेमुळे दुभत्या जनावरांच्या दुधावर परिणाम होत असल्याने प्रत्येक जनावरांसाठी एक फॉगर बसवत त्यातून रोज दिवसभरात तीन वेळेस फॉगरच्या माध्यमातून त्यांना थंड ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हटविण्यात यावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाची मालवणात बाईक रॅली सांगलीत डफावर टाफ मारत शाहिरी प्रशिक्षण सुरू, 15 शिबिरार्थी घेत आहेत शाहिरीचे धडे

एकीकडे शाहिरी कला लोप पावत असताना सांगलीत मात्र ही कला जिवंत रहावी यासाठी नवे शाहीर तयार केले जात आहेत.

शासनाच्या कला संचालनालयाकडून सांगलीत शाहिरी प्रशिक्षण देण्यात येत आहे.

10 मार्च पासून हे शाहिरी प्रशिक्षण सुरू असून याची सांगता 19 मार्च रोजी होणार आहे.

या शाहिरी प्रशिक्षण कार्यक्रमात 15 उदयोन्मुख शाहीर सहभागी झाले आहेत. या शिबिरातून किमान 15 शाहीर तयार होणार आहेत. त्यामुळे सांगलीला आणखी 15 शाहीर मिळणार आहे.

विकास बनसोडे हत्या प्रकरणात सहा आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी

बीडच्या आष्टीतील विकास बनसोडे हत्या प्रकरणातील आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. या प्रकरणात सहा आरोपी अटकेत असून इतर चार जण अद्याप फरार आहे.

आष्टी तालुक्यातील घुमरी पिंपरी येथे प्रेम संबंधाच्या संशयातून भाऊसाहेब क्षीरसागर याने विकास बनसोडे या तरुणाची हत्या केली होती.

या प्रकरणात आष्टी पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांसह दहा जणांविरोधात खुनासह ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

यातील सहा आरोपींना आष्टी न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. तर इतर चार जण अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नरसी येथे पक्ष प्रवेश सोहळा पडणार पार

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे 23 मार्च रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

अजित पवार यांच्या उपस्थितीत माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह अनेक जणांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश होणार आहे.

या पक्ष प्रवेश सोहळ्याची सध्या जय्यत तयारी करण्यात येत आहे.

नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी या ठिकाणी हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार असून या सोहळ्याच्या सभा मंडपाचे भूमिपूजन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर,माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्या सह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

नारायणगाव बसस्थानकाजवळील कपड्याच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडलीय

अष्टविनायक रेडीमेड कापड दुकानाला पहाटेच्या सुमारास आग लागली असुन आगीसह धुराचे लोट सर्वत्र पसरले त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले मात्र आगीची तिव्रता अधिक असल्याने आगीत दुकानातील सर्व कपडे व साहित्य जळुन भस्मसात झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

शिवसेनेचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची मागणी

महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी दिले होते.

मात्र, प्रत्यक्षात 1500 रुपये देण्यात येत असल्याने महिलांचा अपेक्षाभंग झाला आहे,असा आरोप साताऱ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिलांनी केला आहे.

शिवसेना उबाठा गटाच्या महिलांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत सरकारकडून आश्वासनाच्या पूर्णतेची मागणी केली.

यावेळी शहरातील शिवसेनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

महिलांनी जोरदार शब्दांत सरकारवर टीका करत, राज्यभरातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये पूर्ण रक्कम दिली जावी,अशी मागणी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.